बायकोनं नवऱ्याची हत्या करून मृतदेह बाथरूम खोदून लपवला, दीरानं पितळ उघडं पाडलं

crime news : महिलेनं पतीची हत्या करून त्याचा मृतदेह एका बाथरूममध्ये पुरला होता. त्याच बाथरूममध्ये ती दररोज अंघोळ करायची. विशेष म्हणजे संबंधित महिला ही 45 दिवस बेपत्ता असल्याचे नाटक करायची. नातेवाईक आणि शेजाऱ्यांजवळ ती रडण्याचा आव आणायची, असं करत तिने काही दिवस सर्वांचीच दिशाभूल केली.

ADVERTISEMENT

MumbaiTak
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

दीराला भावाच्या मृत्यूचा संशय बळावला

point

बँक खात्यातून पैसे कोण कढतयं?

Crime News : उत्तर प्रदेशातील आग्रा येथून एक मन सुन्न करून टाकाणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महिलेनं पतीची हत्या करून त्याचा मृतदेह एका बाथरूममध्ये पुरला होता. त्याच बाथरूममध्ये ती दररोज अंघोळ करायची. विशेष म्हणजे संबंधित महिला ही 45 दिवस बेपत्ता असल्याचे नाटक करायची. नातेवाईक आणि शेजाऱ्यांजवळ ती रडण्याचा आव आणायची, असं करत तिने काही दिवस सर्वांचीच दिशाभूल केली. अखेर तिच्याच दीराला हत्येचा भलताच संशय बळावला होता. या प्रकरणी पत्नी रुबी शर्माच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. 

हे ही वाचा : Mumbai Monsoon : मुंबईत पावसाची धुव्वादार बॅटिंग, चार दिवसांत तिघांचा दुर्दैवी मृत्यू

दीराला भावाच्या मृत्यूचा संशय बळावला

मृत पतीची ओळख सुरेंद्र शर्मा (वय 44) अशी ओळख समोर आली. ती आपल्या मुलींसह आग्रा येथेच राहत होती. 18 मे रोजी सुरेंद्र अचानकपणे गायब झाल्याची माहिती रुबीनाने दिली होती. तिने आपला पती बेपत्ता झाल्याची पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली होती. काही दिवसांपासून पतीचा शोध घेणं सुरूच होता. तक्रार दाखल केल्यानंतर रुबी नातेवाईकांसोबतच पतीचा शोध घेण्याचं नाटक करायची. या प्रकरणी दीराला पतीच्या मृत्यूचा संशय बळावला होता. 

बँक खात्यातून पैसे कोण कढतयं?

सुरेंद्रचा भाऊ अनिल शर्माने रुबीच्या वागण्याबाबत संशय व्यक्त केला. सुरेंद्र हा बेपत्ता असून त्याच्या बँक खात्यातून पैसे कोण कढतयं? असा प्रश्न त्याला उपस्थित झाला. त्याने पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती. अनिल शर्माने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सुरेंद्रच्या घरात जाऊन चौकशी केली. 

बाथरूमच्या फरशीमुळे बिंग फुटलं

तपासादरम्यान, पोलिसांना घरातील बाथरूम दिसले, त्या फरशीमुळे मोठं बिंग फुटलं. त्यांनी बाथरूममध्ये खोदकाम करण्यास सुरुवात केली. सिमेंट काढल्यानंतर त्या खालून माती दिसून आली. त्या खड्ड्यात सुरेंद्र शर्माचा मृतदेह आढळून आला होता. संबंधित व्यक्तीला दीड महिन्यांपासून शोध सुरू होता. या खुलाश्याने परिसर हादरून गेला. 

हे ही वाचा : Astrology : चातुर्मास सुरू होताच, 'या' राशींचे भाग्य उजळून निघेल

पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनास पाठवला होता, शवविच्छेदन अहवाल आणि वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे या संपूर्ण घटनेची पडताळणी करण्यात आली. हत्येमागील हेटू, कट आणि या प्रकरणात नेमका कोणाचा सहभाग आहे याचा पोलीस तपास करत आहेत.