मुंबईसह राज्यभरात पावसाचा धिंगाणा, महापालिकेचे 10 हजार कर्मचारी अॅक्टिव्ह मोडवर
Mumbai Monsoon : बृहन्मुंबई क्षेत्रात सुरू असलेल्या अति मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची संपूर्ण यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहे. महापालिकेचे तब्बल 10 हजार कर्माचारी आणि अधिकारी अशा स्थितीत काम बजावताना दिसत आहेत. सततच्या पावसामुळे सखल भागांमध्ये पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने रविवारी 5 जुलै 2026 रोजी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट वर्तवला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबई महापालिका अॅक्टिव्ह मोडवर
मुंबईत महापालिकेचे कर्मचारी लक्ष ठेवून
Mumbai Monsoon : बृहन्मुंबई क्षेत्रात सुरू असलेल्या अति मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची संपूर्ण यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहे. महापालिकेचे तब्बल 10 हजार कर्माचारी आणि अधिकारी अशा स्थितीत काम बजावताना दिसत आहेत. सततच्या पावसामुळे सखल भागांमध्ये पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने रविवारी 5 जुलै 2026 रोजी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट वर्तवला आहे. महापालिकेनं नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे. अशातचच महापौर रितू तावडे यांनी आज 4 जुलै 2026 रोजी संपूर्ण परिस्थितीचा आढावा देखील घेतला. त्यांचे काही फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
हे ही वाचा : Mumbai Monsoon : मुंबईसह राज्यभरात पुढील तीन दिवस पावसाची बॅटिंग, वाहतुकीचे महत्त्वाचे अपडेट
मुंबई महापालिका अॅक्टिव्ह मोडवर
मुंबईसह राज्यात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर अपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी मुंबई महापालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षला आज (4 जुलै) रोजी भेट दिली होती. तसेच मुंबईतील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला होता. अतिरिक्त महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर, तसेच पूर्व उपनगरांचे अतिरिक्त महापालिका आयुक्त अविनाश ढेकणे, उपायुक्त शरद उघडे, संचालक महेश नार्वेकर, तसेच प्रमुख अधिकारी रश्मी लोखंडे आणि इतर संबंधित इतर अधिकारी हे उपस्थित होते.
अशातच अश्विनी भिडे या सातत्याने आढावा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मुंबईला हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट वर्तवलेला आहे. अशातच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. सरकारी शाळा आणि महाविद्यालयांना 4 जुलै 2026 रोजी दुपारी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. पश्चिम उपनगरांत मुसळधार पावसामुळे मोगरा नाला तुटुंब वाहताना दिसत आहेत. तसेच मोगरा नाला प्रणालीशी जोडलेले लहान नालेही भरभरून वाहत आहेत. परिणामी, परिसरातील रस्त्यांना नदी नाल्याचे स्वरुप प्राप्त झालेलं आहे. सततच्या पावसामुळे पाण्याचा निचरा होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे.
मुंबईत महापालिकेचे कर्मचारी लक्ष ठेवून
याच पार्श्वभूमीवर चेंबूर, येथील नूर-ए-इलाही सेवा रस्ता अंधेरी येथील वीरा देसाई रस्ता, महापालिका बाजारपेठ रस्ता. स्वामी विवेकानंद मार्ग, अंधेरी भुयारी मार्ग, विक्रोळी येथील असलेला हुमा मॉल परिसर, गांधीनगर जंक्शन तसेच परेश पार्क बाजारपेठ येथील रस्ते बंद तात्पुरचे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. तसेच मुंबईतील काही परिसरातील मॅनहोलमध्ये नागरिक पडून त्यांचा अपघात होऊन मृत्यू होण्याची शक्यता आहे, याच पार्श्वभूमीवर महापालिकेचे कर्मचारी लक्ष ठेवून आहेत.
प्रतिबंधासाठी औषध घेण्याचे महापालिकेचं आवाहन
कचरा, गाळ, भाज्या पाण्यात अडकल्याने पाण्याच्या प्रवाहात मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी प्रतिबंधासाठी औषध म्हणून डॉक्सीसायक्लिन 200 मिग्रॅ (Doxycycline 200 mg) घेण्याचे आवाहन केलं. ही गोळी घेण्यासाठी महापालिकेच्या दवाखान्यात उपलब्ध होतील अशी माहिती दिली. पाण्याचा निचरा होण्यासाठी महापालिकेनं जिकडे तिकडे पंप बसवून निचरा करण्याचे काम सुरु ठेवले आहे.
हे ही वाचा : पुण्याची गोष्ट : मिसिंग लिंकचे दोन महिन्यापूर्वी उद्घाटन, पहिल्याच पावसात ठिकठिकाणी खड्डे
5 जुलै 2026 रोजी मुंबईला पावसाचा रेड अलर्टचा अंदाज
दरम्यान, भारतीय हवामान विभागानुसार, 5 जुलै 2026 रोजी अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईला पावसाचा रेड अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. याचपार्श्वभूमीवर नागरिकांनी पावसाबाहेर बाहेर पडणं टाळावे. पाणी साचलेल्या रस्त्यांवरून अथवा उघड्या नाल्यांच्या परिसरातून जाणं टाळावे, तसेच विद्युत खांब, तुटलेल्या आणि विस्कळीत झालेल्या तारा कुठे आढळून आल्यास महापालिकेच्या अपत्ती विभागाच्या व्यवस्थापनाने कार्यालयाशी संपर्क साधावा आणि माहिती संबंधित प्रशासनास माहिती द्यावी, अशी माहिती देण्यात आली.
