पुण्याची गोष्ट : मिसिंग लिंकचे दोन महिन्यापूर्वी उद्घाटन, पहिल्याच पावसात ठिकठिकाणी खड्डे
Pune News : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेला जोडलेल्या गेलेल्या मिसिंग लिंकचे नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन केले होते. मात्र, पहिल्याच पावसात मिसिंग लिंकवर खड्डे दिसून येत आहेत, यामुळे आता प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय. या परिस्थितीवर गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मिसिंग लिंकच्या केबल-स्टेयड पुलावर ठिकठिकाणी खड्डे
खड्ड्यांमुळे वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न
पुण्याची गोष्ट : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेला जोडलेल्या गेलेल्या मिसिंग लिंकचे नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन केले होते. मात्र, पहिल्याच पावसात मिसिंग लिंकवर खड्डे दिसून येत आहेत, यामुळे आता प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय. या परिस्थितीवर गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा : बायकोनं नवऱ्याची हत्या करून मृतदेह बाथरूम खोदून लपवला, दीरानं पितळ उघडं पाडलं
मिसिंग लिंकच्या केबल-स्टेयड पुलावर ठिकठिकाणी खड्डे
मिळालेल्या माहितीनुसार, मिसिंग लिंकच्या केबल-स्टेयड पुलावर अनेक ठिकाणी खड्डे आढळून आले होते. याच खड्ड्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. अशातच स्थानिक रहिवाशांनी आणि वाहनचालकांनी बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्हे उपस्थित केले आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करून अभारलेला मोठा प्रकल्प पहिल्यात पावसात खराब झाला.
खड्ड्यांमुळे वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग हा देशातील एकूण महामार्गांपैकी एक आहे. त्यामुळे, पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होतो. या मार्गावरून दररोज हजारो वाहने प्रवास करत असतात, वेगाने वाहणाऱ्या वाहनांसाठी असे खड्डे अपघाताचे कारण ठरू शकते, असा नागरिकांचा संताप आहे.
पहिल्याच पावसात जर मिसिंग लिंकची अशी परिस्थिती दिसून येत असेल तर चिंतेची बाब आहे. प्रश्न उपस्थित होतो की, मिसिंग लिंक उद्घाटनापूर्वी पाहणी करण्यात आली होती का? जर पाहणी केली असती तर मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले? असा प्रश्न उपस्थित होतो.










