प्रेयसीला पळवून नेलं पण घरच्यांनी शोधून काढलं, 12 दिवसानंतर प्रियकराने सगळ्यांना हादरवलं!

मुंबई तक

Bihar Crime News: एका 5 वर्षांच्या निष्पाप बालकाची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. हा गुन्हा पीडित मुलाच्या बहिणीच्या प्रियकरानेच केल्याचा खळबळजनक आरोप आहे.

ADVERTISEMENT

bihar girlfriends younger brother murdered boyfriend arrested crime news marathi
प्रातिनिधिक फोटो
Google CTA

बातम्या हायलाइट

point

प्रेयसीच्या लहान भावाची हत्या

point

प्रियकर अटकेत

Bihar News : बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका 5 वर्षांच्या निष्पाप बालकाची गळा दाबून हत्या करण्यात आली असून, हा गुन्हा पीडित मुलाच्या बहिणीच्या प्रियकरानेच केल्याचा खळबळजनक आरोप आहे. हत्येनंतर आरोपीने बालकाचा मृतदेह घरापासून अवघ्या 200 मीटर अंतरावरील झुडपात फेकून दिला होता. या प्रकरणी मुख्य आरोपी आणि त्याच्या आई-वडिलांना अटक करण्यात आली आहे. सिद्धार्थ कुमार असे मृत बालकाचे नाव आहे.

वादाचा बदला

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी धनसेवक कुमार उर्फ निकेश हा पीडित कुटुंबाच्या शेजारीच राहतो. त्याचे मृत सिद्धार्थच्या मोठ्या बहिणीसोबत प्रेमसंबंध होते. अवघ्या 12 दिवसांपूर्वी आरोपी धनसेवक हा सिद्धार्थच्या बहिणीला घरातून पळवून घेऊन गेला होता. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला आणि तीन दिवसांनंतर तिला सुखरूप घरी परत आणले. या घटनेनंतर दोन्ही कुटुंबांमध्ये वाद सुरू झाला होता. याच वादाचा बदला घेण्यासाठी आरोपीने हे भयंकर पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

हे ही वाचा : 'तू जाड आहेस, तुला बाळही होत नाही', पतीकडून पत्नीची क्रूरपणे हत्या

पहाटेच मुलाचं अपहरण

मृत बालकाच्या आईने आरोप केला आहे की, 30 जून रोजी पहाटेच्या सुमारास जेव्हा घरातील सर्व सदस्य गाढ झोपेत होते, तेव्हा आरोपी धनसेवक त्यांच्या 5 वर्षांच्या मुलाला घरातून उचलून घेऊन गेला. सकाळी मुलगा गायब असल्याचे समजताच कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु तो कुठेही सापडला नाही. अखेर कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयाच्या आधारे धनसेवकला ताब्यात घेतले आणि त्याची कसून चौकशी केली. पोलिसांच्या कडक चौकशीदरम्यान आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आणि त्याच्याच सांगण्यावरून झुडपातून निष्पाप सिद्धार्थचा मृतदेह जप्त करण्यात आला.

हे ही वाचा : मुंबईच्या साकीनाका परिसरात मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू

प्रेमप्रकरणातून हत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात हे हत्याकांड प्रेमप्रकरणातून आणि कौटुंबिक वादातून घडल्याचे समोर आले आहे. पोलीस सध्या सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत असून पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. फॉरेन्सिक (FSL) टीम आणि श्वान पथकाला (डॉग स्क्वॉड) पाचारण करून महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले आहेत.

हे वाचलं का?