वाढदिवस साजरा करायला मित्राच्या घरी गेली अन् घडलं भयानक, पाच जणांना अटक
वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. बेंगलोरमधील ही घटना असून याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
वाढदिवस साजरा करायला मित्राच्या घरी गेली अन् घडलं भयानक
पाच जणांना अटक
Crime News : 'बिलेटेड बर्थडे' साजरा करण्याच्या बहाण्याने एका महिलेला जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत पाच जणांना अटक केली आहे. महिलेला आधी घरी बोलावण्यात आले आणि त्यानंतर शीतपेयामधून अंमली पदार्थ देऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्यात आल्याचा आरोप आहे. ही घटना 30 जून रोजी घडली असून, पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. कर्नाटकची राजधानी बेंगलोर येथील ही घटना आहे.
'हॉटेलमध्ये पार्टी करु'
तक्रारीनुसार, पीडित महिलेची सोमशेखर नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली होती. काही काळापासून ते एकमेकांच्या संपर्कात होते आणि त्यांची यापूर्वी भेटही झाली होती. घटनेच्या काही दिवसांपूर्वी महिलेचा वाढदिवस होता, परंतु सोमशेखर तिला भेटू शकला नव्हता. त्यामुळे त्याने 'बिलेटेड बर्थडे' साजरा करण्याच्या निमित्ताने तिला तालाघट्टापुरा येथे बोलावले. 30 जून रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास महिला ठरलेल्या ठिकाणी पोहोचली, तेव्हा सोमशेखर आणि त्याचे काही मित्र तिथे आधीच उपस्थित होते. आधी घरी जाऊया आणि नंतर हॉटेलमध्ये पार्टी करू, असे सांगून सोमशेखरने तिला आपल्या घरी नेले.
हे ही वाचा : Maharashtra Weather : मुंबईसह 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट, 29 जिल्ह्यांवर पावसाचं तांडव
गैरकृत्य करणारा नेमका कोण?
घरी पोहोचल्यानंतर सर्वजण एकत्र बसले आणि त्यांनी जेवण केले. त्यानंतर सोमशेखर आणि त्याच्या मित्रांनी महिलेला एक कोल्ड्रिंक पिण्यास दिले. महिलेने आरोप केला आहे की, हे कोल्ड्रिंक प्यायल्यानंतर तिला चक्कर येऊ लागली आणि ती अर्धवट शुद्धीत राहिली. ती स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नसतानाच, पाच जणांपैकी एकाने खोलीत येऊन तिच्या असहायतेचा गैरफायदा घेत तिच्यावर बलात्कार केला. यावेळी इतर मित्र हॉलमध्येच हजर होते. महिला पूर्णपणे शुद्धीत नसल्याने सुरुवातीला तिला तिच्यासोबत गैरकृत्य करणारा नेमका कोण होता, हे ओळखता आले नाही.
हे ही वाचा : केतनच्या हत्येनंतर वडिलांनाही गमावलं, विशाल अग्रवाल यांची भावनिक पोस्ट
पाच जणांना न्यायालयीन कोठडी
या घटनेनंतर पीडितेने तात्काळ पोलिसांत धाव घेतली. तालाघट्टापुरा पोलीस ठाण्यातील एका महिला उपनिरीक्षकाने पीडितेचे समुपदेशन करून तिचा सविस्तर जबाब नोंदवून घेतला. पोलिसांनी या प्रकरणाचा वेगाने तपास केला असता, अमरेश नावाच्या आरोपीने महिलेवर अत्याचार केल्याचे समोर आले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मुख्य आरोपी अमरेश, सोमशेखर आणि त्यांच्या इतर तीन मित्रांना अटक केली. न्यायालयाने सर्व पाचही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली असून, पोलीस या घटनेशी संबंधित इतर पुरावे गोळा करत असून पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.










