केतनच्या हत्येनंतर वडिलांनाही गमावलं, विशाल अग्रवाल यांची भावनिक पोस्ट
केतन अग्रवालच्या हत्येमुळे आधीच दु:खात असलेल्या अग्रवाल कुटुंबियांवर पुन्हा एकदा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. केतन अग्रवालचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचे निधन झाले आहे
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
केतनच्या हत्येनंतर वडिलांनाही गमावलं
विशाल अग्रवाल यांची भावनिक पोस्ट
Ketan Agarwal Murder Case : केतन अग्रवाल हत्याकांडामुळे आधीच प्रचंड धक्क्यात असलेल्या अग्रवाल कुटुंबावर आता आणखी एक मोठा आघात झाला आहे. केतन अग्रवालचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचे पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. कुटुंबातील या ज्येष्ठ सदस्याच्या जाण्याने अग्रवाल परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या निकटवर्तीयांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
नातवाच्या हत्येने दु:ख
मिळालेल्या माहितीनुसार, देवीचंद अग्रवाल यांच्यावर काही काळापूर्वी एक मोठी हृदय शस्त्रक्रिया झाली होती. या शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या प्रकृतीत सातत्याने चढ-उतार होत होते. अशातच त्यांचा नातू केतन अग्रवाल याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंब हादरून गेले असून, या वयात देवीचंद अग्रवाल यांच्यावरही याचा मानसिक परिणाम झाला होता. नातवाच्या हत्येचे दुःख ते सहन करू शकले नाहीत, असे बोलले जात आहे.
हे ही वाचा : Mumbai Monsoon : मुंबईसह राज्यभरात पुढील तीन दिवस पावसाची बॅटिंग, वाहतुकीचे महत्त्वाचे अपडेट
केतनच्या वडिलांची भावनिक पोस्ट
दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती अचानक अधिकच बिघडल्यामुळे त्यांना तातडीने पुण्याच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवून शर्थीचे प्रयत्न सुरू केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वडील देवीचंद यांच्या निधनानंतर केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी आपल्या सोशल मीडिया स्टेटसवर "Miss You Dad" असे लिहीत आपल्या भावना व्यक्त केल्या असून, यावरून संपूर्ण कुटुंबाच्या वेदना समोर येत आहेत.
हे ही वाचा : मुंबईची खबर : 'कानाखाली देऊ का?' महापौर रितू तावडे कुणावर संतापल्या?
हत्येचा तपास सुरु
एकीकडे तरुण नातू केतन अग्रवाल याच्या हत्येचा तपास अजूनही सुरू असून, पोलीस या प्रकरणात सातत्याने कायदेशीर कारवाई करत आहेत. कुटुंब अजून या धक्क्यातून सावरलेले नसतानाच आणि आपल्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी लढा देत असतानाच, घरातील मुख्य छत्र हरपल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सध्या अग्रवाल कुटुंबाला धीर देण्यासाठी त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार आणि ओळखीचे लोक मोठ्या संख्येने उपस्थित असून, सर्वत्र शोककळा पसरली आहे.










