सीजेपी आंदोलनातील मोठी बातमी! युट्यूबर ध्रुव राठी पोलिसांच्या ताब्यात, नेमकं काय घडलं?

मुंबई तक

सीजेपी आंदोलनातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. युट्यूबर ध्रुव राठी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ADVERTISEMENT

Dhruv Rathee Detained
Dhruv Rathee Detained
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

सीजेपी आंदोलनातील मोठी बातमी

point

युट्यूबर ध्रुव राठी पोलिसांच्या ताब्यात

point

नेमकं काय घडलं?

Dhruv Rathee Detained : प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठी यांना गुरुग्राममधील त्यांच्या घरातून दिल्ली पोलिसांकडून सकाळी आठ वाजता ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 'सीजेपी फॉर इंडिया' या एक्स अकाउंटवरील माहितीनुसार, सुमारे 50 साध्या वेशातील पोलीस कर्मचारी सकाळी त्यांच्या घरी पोहोचले होते. मात्र, त्यांना नेमक्या कोणत्या कारणास्तव आणि कोणत्या प्रकरणात ताब्यात घेतले गेले आहे, याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

ध्रुव राठीचे आवाहन

गुरुवारी (8 ऑक्टोबर) ध्रुव राठी बंगळूरुमध्ये एसआयआर (SIR) विरोधातील आंदोलनात सहभागी झाला होता. तसेच शुक्रवारी ध्रुव राठीने कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनातील आपल्या सहभागाबद्दल इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती. त्याने केंद्र सरकारवर निशाणा साधला होता आणि लोकांना जंतर मंतरवर पोहोचून आंदोलनात सामील होण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, सीजेपीने ध्रुव राठी आणि ताब्यात घेण्यात आलेल्या इतर शेकडो नागरिक व विद्यार्थी कार्यकर्त्यांची तात्काळ आणि बिनशर्त सुटका करण्याची मागणी केली आहे. 

हे ही वाचा : CJP Protest : दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपके कधी पोहोचणार?

दिल्ली पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

दुसरीकडे, सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार टाळण्यासाठी आणि चोख बंदोबस्त राखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. परिस्थितीवर बारीक नजर ठेवण्यासाठी आणि प्रत्येक हालचालीची अचूक नोंद घेण्यासाठी जवानांवर अत्याधुनिक बॉडी कॅमेरे बसवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, हे कॅमेरे अंधारातही अत्यंत प्रभावीपणे काम करण्यास सक्षम असल्याची माहिती देण्यात आली आहे.

हे ही वाचा : बॉडी कॅमेरे लावून आंदोलकांवर नजर, CJP आंदोलनासाठी दिल्ली पोलिसांचे चक्रव्यूह!

सीजेपीला परवानगी का नाकारली?

दरम्यान, सीजेपीच्या या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली असून, त्यामागचे कारण स्पष्ट करणारे एकृत अधिकृत निवेदन जारी केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीजेपीचा अर्ज 7 ऑक्टोबर रोजी प्राप्त झाला होता, तर नियोजित कार्यक्रम 10 ऑक्टोबर रोजी होता; म्हणजेच नियमांनुसार अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत पाळली गेली नव्हती. याशिवाय, यापूर्वी झालेल्या आंदोलनांमध्ये नियमांचे कथित उल्लंघन झाल्याचे कारणही पोलिसांनी या निर्णयामागे दिले आहे.