पोलीस विमानात शिरले अन् एकच गोंधळ, घोषणाबाजी; दिपकेंना ताब्यात घेताना विमानात नेमकं काय घडलं? VIDEO
सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यासह सौरव दास आणि आशुतोष रांका यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी थेट विमानात शिरुन तिघांना ताब्यात घेतले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पोलीस विमानात शिरले अन् एकच गोंधळ, घोषणाबाजी
दीपकेंना ताब्यात घेताना विमानात नेमकं काय घडलं?
CJP Protest Delhi : सीजेपी आंदोलनासंबंधी सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यासह सौरव दास आणि आशुतोष रांका यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी थेट विमानात शिरुन तिघांना ताब्यात घेतले. त्यांना ताब्यात घेऊन एका बसमधून विमानतळाच्या मागील बाजूच्या गेटमधून बाहेर नेण्यात आले, अशी माहिती समोर आली आहे. याठिकाणी माध्यमांना जाण्यासाठी परवानगी नव्हती. यावेळी विमानात काही नाट्यमय घडामोडी पहायला मिळाल्या. याआधी ध्रुव राठी, सीजेपीच्या लीगल टीममधील रत्ना सिंह यांनाही ताब्यात घेण्यात आले.
विमानात काय घडलं?
यावेळी विमानात महिला पोलिसांसह काही पुरुष पोलिसांची तुकडी शिरली. यावेळी दिपके म्हणाले की, 'तुम्ही बघू शकता देश कोणत्या दिशेने चालला आहे. ते (पोलीस) आम्हाला थेट विमानातून ताब्यात घेण्यासाठी आले आहेत. इंदिरा गांधींनीदेखील असं कधी केलं नव्हतं. ही हुकूमशाही आहे. दिल्ली पोलीस थेट विमानात शिरले असून ते आम्हाला अटक करण्याचा प्रयत्न करत आहेत.' यापुढं पोलिसांशी बोलताना दिपके म्हणाले की, 'आम्ही अरेस्ट होण्यासाठीच आलो आहोत. आम्हाला अटक करा. आम्ही तुम्हाला घाबरत नाही.'
हे ही वाचा : सीजेपी आंदोलनातील मोठी बातमी! युट्यूबर ध्रुव राठी पोलिसांच्या ताब्यात, नेमकं काय घडलं?
विमानात घोषणाबाजी
यानंतर विमानात उपस्थित असलेल्या सीजेपीच्या सदस्यांनी 'भारतमाता की जय', 'इन्कलाब जिंदाबाद' अशा घोषणा दिल्या. यानंतर पोलीस तिघांना विमानातून बाहेर घेऊन गेले. यावेळी पोलिसांसोबत जाताना पुन्हा एकदा दिपके म्हणाले की, 'NSA, UAPA जे काही लावायचं आहे ते लावा.' तिघांना ताब्यात घेऊन दिल्ली पोलीस एका बसमधून विमानतळाच्या मागील बाजूच्या गेटने घेऊन गेल्याची माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा : CJP Protest : दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपके कधी पोहोचणार?
'बिनशर्त सुटका करावी'
दरम्यान, या अटेकनंतर सीजेपीने एक प्रेस रीलिज जारी केली आहे. या प्रेस रीलिजमध्ये या तिघांच्या अटकेचा निषेध करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या बिनशर्त सुटकेची मागणीदेखी सीजेपीतर्फे करण्यात आली आहे. या नाट्यमय घडामोडींनंतर सीजेपीच्या आंदोलनाला कोणती दिशा मिळते हे पाहणं महत्त्वाचं आहे.
