यूट्यूबर ध्रुव राठीची मध्यरात्री सुटका, जंतर-मंतरवर आल्यास ..पोलिसांचा 'तो' इशारा

मुंबई तक

Dhruv Rathee Released : यूट्यूबर ध्रुव राठी यांची दिल्ली पोलिसांनी पहाटे तीन वाजता सुटका केली. जंतर-मंतरवर आंदोलनाचा प्रयत्न केल्यास पुन्हा कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

ADVERTISEMENT

 YouTuber Dhruv Rathee
YouTuber Dhruv Rathee
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

यूट्यूबर ध्रुव राठीची मध्यरात्री सुटका

point

जंतर-मंतरवर आल्यास ..पोलिसांचा 'तो' इशारा

YouTuber Dhruv Rathee : सीजेपीच्या आंदोलनासाठी मैदानात उतरण्याच्या तयारीत असलेल्या यूट्यूबवर ध्रुव राठीला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर  दिल्ली पोलिसांनी पहाटे तीन वाजता त्याची सुटका केली. जंतर-मंतरवर येण्याचा प्रयत्न केल्यास पुन्हा कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.  

सीजेपीच्या आंदोलनापूर्वीच अनेकांना घेण्यात आले होते ताब्यात 

दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुग्राममधील सेक्टर 56 येथील केंद्रीय विहार परिसरातून त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. ध्रुव राठी हे आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी आले असल्याची माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी ही माहिती गुरुग्राम पोलिसांना दिली. दोन्ही पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. गुरुवारी ध्रुव राठी बंगळुरू येथे विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेविरोधातील आंदोलनात सहभागी झाले होते. शनिवारी दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनापूर्वी ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी दिल्लीतील वाहतुकीत बदल होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : मोठी बातमी : अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांची सुटका, न्यायालयात काय घडलं?

 दिल्लीमध्ये शनिवारी झालेल्या कारवाईनंतर रविवारी आंदोलन आणखी वाढण्याची शक्यता आहे. कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन सुरू ठेवण्याची घोषणा केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे सीजेपी नेते अंजिक्य शिंदे यांनी शनिवारी जाहीर केले होते. पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके तसेच नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांनाही शनिवारी ताब्यात घेण्यात आले होते. रविवारी त्यांना दिल्लीतील एसीएम न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आलीये. शनिवारी दिल्लीमध्ये निर्बंध लावणे, मेट्रो आणि रेल्वे वाहतूक रोखणे तसेच नागरिकांना ताब्यात घेणे या मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयात रविवारी सुनावणी होणार आहे. यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या अवमान याचिकेवर विशेष पीठ सुनावणी करणार आहे.