विवाहित महिलेचं भाच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिप, नंतर दोघांचाही मृत्यू

मुंबई तक

Crime news : एका 33 वर्षीय विवाहित महिलेचं 32 वर्षीय भाच्यासोबत प्रेमसंबंध होते. ते दोघेही लिव्ह इनमध्ये राहत असल्याची घटना समोर आली. मात्र नंतर दोघांच्याही संशयास्पद मृत्युने एकच खळबळ उडाली. एकाचा मृतदेह हा रेल्वे ट्रॅकवर आढळून आला होता. तर दूसरा मृतदेह घरात आढळून आला होता.

ADVERTISEMENT

crime news
crime news
Google CTA

बातम्या हायलाइट

point

विवाहित महिलेचं भाच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिप

point

महिलेचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर

point

तरुणाचा घरात मृतदेह

Crime news : पश्चिम बंगालच्या उत्तर परगना जिल्ह्यात मन सून्न करून टाकणारा प्रकार उघडकीस आला. एका 33 वर्षीय विवाहित महिलेचं 32 वर्षीय भाच्यासोबत प्रेमसंबंध होते. ते दोघेही लिव्ह इनमध्ये राहत असल्याची घटना समोर आली. मात्र नंतर दोघांच्याही संशयास्पद मृत्युने एकच खळबळ उडाली. एकाचा मृतदेह हा रेल्वे ट्रॅकवर आढळून आला होता. तर दूसरा मृतदेह घरात आढळून आला होता. अशातच या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहे. 

हे ही वाचा : नाशिकमध्ये रेड अलर्ट, त्र्यंबकेश्वर मंदिर बंद; व्हिडिओ व्हायरल

पोलीस आणि कुटुंबियांच्या माहितीनुसार, मृत महिलेची रुनु मंडल अशी ओळख समोर आली. तिचा  विवाह 14 वर्षांपूर्वी बनगांव परिसरात झाला होता. ती सतत आपल्या माहेरी यायची. याचदरम्यान देवाशीप मंडल नावाच्या तरुणाशी तिची भेट होऊ लागली होती, तरुण हा तिचा भाचा असल्याचं म्हटलं जातंय. 

विवाहित महिलेचं भाच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिप

सांगण्यात येतेय की, दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. दोघांमधील जवळीकता वाढू लागल्याने ते भाडेतत्त्वार घर घेऊन राहू लागले होते. दोघेही काही काळापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र, ज्या दिवशी दोघांचाही मृत्यू झाला होता, त्याच दिवशी रेल्वे ट्रॅकवर महिला रुनू मंडलचा मृतदेह आढळून आला होता. 

याचदरम्यान पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी खोलीचा दरवाजा तोडून तरुणाला पाहिलं. तेव्हा तरुण देवाशीष मंडल हा मृतावस्थेत पडला होता. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली होती. अशातच तरुणाच्या कुटुंबाचा कुटुंबाचा आरोप असा की, तो मागील काही कालावधीपासून नातेसंबंधांना घेऊन मानसिक तणावात होता. 

हे वाचलं का?