डोंबिवलीत शिंदे सेनेच्या नगरसेवकाकडून महिला डॉक्टरला मारहाण, Video व्हायरल
Dombivli Crime : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या कोपरा परिसरातील शास्त्रीनगर रुग्णालयात सोमवारी सायंकाळी लज्जास्पद प्रकार घडला आहे. शिंदे सेनेच्या नगरसेवकांनी रुग्णालयीत नर्स आणि डॉक्टरांना मारहाण केली आहे. या निषेधार्थ पारिचारिका आणि रुग्णालय व्यवस्थापनाने या घटनेचा निषेध करत ओपीडी सेवा पूर्णपणे बंद ठेवली आहे, तसेच इमर्जन्सी सेवा सुरु ठेवली आहे. याचा शेकडो रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
डॉक्टरांना शिंदे सेनेच्या आमदाराने केली मारहाण
डॉक्टरांनी पोलीस ठाण्यात घेतली धाव
Dombivli Crime : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या कोपरा परिसरातील शास्त्रीनगर रुग्णालयात सोमवारी सायंकाळी लज्जास्पद प्रकार घडला आहे. शिंदे सेनेच्या नगरसेवकांनी रुग्णालयीत नर्स आणि डॉक्टरांना मारहाण केली आहे. या निषेधार्थ पारिचारिका आणि रुग्णालय व्यवस्थापनाने या घटनेचा निषेध करत ओपीडी सेवा पूर्णपणे बंद ठेवली आहे, तसेच इमर्जन्सी सेवा सुरु ठेवली आहे. याचा शेकडो रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मारहाण करणाऱ्या नगरसेवकाची रमेश म्हात्रे अशी ओळख समोर आली आहे.
हे ही वाचा : केतनच्या हत्येपूर्वी सियाचे चेतनशी सिक्रेट लग्न, साक्षीदार म्हणून मित्रांची स्वाक्षरी
नेमकं काय घडलं?
सोमवारी प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेचे सीझर करण्यात आले होते. नवजात बाळाच्या नाळेला दोन फेऱ्या असल्याने त्याला विशेष उपचारांची गरज होती. मात्र रुग्णालयातील बाळाला अति दक्षता विभागात दाखल करून घेणे शक्य नव्हते. एति दक्षता विभाग हा पूर्णपणे भरलेला होता. यामुळे डॉ. सृष्टी बाविस्कर आणि डॉ. वैभव साळुंखे यांनी बाळाला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यास सांगितले. अशा स्थितीत नातेवाईकांनी स्थानिक नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला होता. डॉक्टर रुग्णसेवेत व्यस्त असल्याने त्यांनी फोनवरून प्रतिसाद दिला नाही. नगरसेवक रुग्णालयात पोहोचल्याचा आरोप करण्यात आला आहे.
डॉक्टरांनी पोलीस ठाण्यात घेतली धाव
संबंधित घटनेची माहिती तातडीने महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांना देण्यात आली होती. नंतर वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दिपा शुक्ला, जखमी डॉक्टर आणि कर्मचारी यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली असून तक्रार दाखल केली. मात्र, अजूनही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
हे ही वाचा : विवाहित महिलेचं भाच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिप, नंतर दोघांचाही मृत्यू
दरम्यान, या हल्ल्यात मारहाणीच्या निषेधार्थ सर्व शासकीय रुग्णालय आणि आरोग्य केंद्राचे डॉक्टर आणि पारिचारिकांचे कामबंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात ओपीडी विभाग पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. इमर्जन्सी सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत.










