सातारा : विजेच्या धक्क्याने सगळं कुटुंब संपलं, एकमेकांना वाचवताना काळाचा घाला
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. खामगाव येथे आज (8 जुलै) पहाटे विजेचा जोरदार शॉक लागून एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सातारा : विजेच्या धक्क्याने सगळं कुटुंब संपलं
एकमेकांना वाचवताना काळाचा घाला
Satara News : सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातून अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. फलटण तालुक्यातील खामगाव येथे आज (8 जुलै) पहाटे विजेचा जोरदार शॉक लागून एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. एकमेकांचे प्राण वाचवण्याच्या प्रयत्नात संपूर्ण कुटुंबच काळाच्या पडद्याआड गेल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
पहाटे काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव येथील एका खाजगी इंग्लिश मीडियम शाळेजवळ राहणाऱ्या शिंदे कुटुंबावर काळाने घाला घातला. बुधवारी (8 जुलै) पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास कुटुंबातील प्रमुख सतीश उर्फ पिसुरड्या किसन शिंदे (45) यांना घराबाहेरील विद्युत वायरमध्ये अचानक आलेल्या प्रवाहाचा जोरदार शॉक लागला. त्यांना शॉक लागल्याचे पाहताच कुटुंबातील इतर सदस्यांनी तात्काळ त्यांच्या दिशेने धाव घेतली.
हे ही वाचा : Monsoon Update : राज्यात अचानक पाऊस का वाढलाय? पुढील तीन दिवस काय इशारा?
जीव वाचवायला गेले, पण...
किसन शिंदे यांना वाचवण्याच्या घाईत गंगुबाई शिंदे (40), सचिन शिंदे (26) आणि आरती शिंदे (24) हे तिघेही एकामागून एक पुढे सरसावले. मात्र, दुर्दैवाने विद्युत प्रवाहाची तीव्रता इतकी जास्त होती की, वाचवण्यासाठी गेलेले हे तिघेही जण त्या जिवंत विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आले. वीजेचा जोरदार झटका लागल्याने काही क्षणांतच या चौघांचाही घटनास्थळी जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यावर अस्मानी संकट, जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा
दुर्घटना नेमकी कशामुळे घडली?
या भीषण दुर्घटनेची माहिती मिळताच फलटण ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आणि घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी फलटण उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. घराबाहेरील वायरमध्ये विद्युत प्रवाह कसा आला, ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली आणि यात महावितरण किंवा इतर कोणाचा निष्काळजीपणा होता का, या सर्व बाबींचा सखोल तपास फलटण ग्रामीण पोलीस करत आहेत.










