नवरा बायकोच्या हनिमूनला नणंद, सासू-सासरे गेले; बायको रागवली अन्..

मुंबई तक

Crime News : नवविवाहित जोडप्यांच्या हनिमूनसाठी नवऱ्या मुलाचे आई-बाबा गेल्याने नवीन संसार सुरू होण्याआधीच नात्याला ब्रेक लागल्याची घटना उघडकीस आली. हनिमूनसाठी जोडप्यांना सासू-सासऱ्यांनी प्रायव्हसी न दिल्याने वधूनेच पतीपासून दूर होण्याचा निर्णय घेतला आहे.  

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

नवरा बायकोच्या हनिमूनसाठी नणंद, सासू-सासरे गेले

point

प्रकरण थेट घटस्फोटापर्यंत

Crime News : नवविवाहित जोडप्यांच्या हनिमूनसाठी नवऱ्या मुलाचे आई-बाबा गेल्याने नवीन संसार सुरू होण्याआधीच नात्याला ब्रेक लागल्याची घटना उघडकीस आली. उत्तर प्रदेशातील मेरठमधून हा विचित्र प्रकार समोर आला असून सर्वजण थक्क झाले आहेत. हनिमूनसाठी जोडप्यांना सासू-सासऱ्यांनी प्रायव्हसी न दिल्याने वधूनेच पतीपासून दूर होण्याचा निर्णय घेतला आहे. 

हे ही वाचा : नागपूर : सावत्र बाप 8 वर्षीय मुलीला कपडे काढायला लावायचा अन् 'नको तेच..'

बहुमा पोलीस ठाणे परिसरातील रामराज येथील एका मुलीचा आणि दिल्लीतीत पटेनगर येथील मुलाचा विवाह झाला होता. मुलगी ही पदवीधर आहे. तर मुलगा सिंगापूरमध्ये हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटचं शिक्षण घेत आहे. 

नवरा बायकोच्या हनिमूनसाठी नणंद, सासू-सासरे गेले

पत्नीने आरोप केला की, लग्नानंतर तिचा नवरा हनिमूनला गेले, पण त्यांच्यासोबत तिची सासू, सासरा, नणंद आणि दीर यांच्यासह संपूर्ण कुटुंहबाला सोबत घेऊन गेला. यामुळे पती-पत्नीमध्ये मोठा वाद निर्माण झाला आणि हे प्रकरण कौटुंबिक समुपदेशन केंद्रापर्यंत पोहोचले. 

नवविवाहित जोडप्याने सांगितलं की, हनिमून हा जोडप्यांसाठी खाजगी आणि महत्त्वाचा काळ असतो. नवरा त्याच्या कुटुंबासोत प्रवासात असल्याने तिला त्याच्यासोबत वेळच घालवता आला नाही. याच प्रकरणाची सुनावणी कुटुंब समुपदेशन केंद्रात सुरू ठेवण्यात आली आहे. यापूर्वी तीन वेळा समुपदेशन झाल्याचे सांगण्यात येते. 

हे वाचलं का?