Govt Jobs : बुलेट ट्रेन बनवणाऱ्या कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी, तब्बल 1 लाखाहून अधिक पगार
नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) मध्ये नोकरीची सुवर्णसंधी चालून आलेली आहे. तंत्रज्ञ पदासाठी ही भरती होणार आहे. यासाठी पात्रतेचे निकष काय आहेत, जाणून घ्या सविस्तर.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
Govt Jobs : बुलेट ट्रेन बनवणाऱ्या कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी
तब्बल 1 लाखाहून अधिक पगार
NHSRCL Recruitment : नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (NHSRCL) तंत्रज्ञ (Technician) पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत सिव्हिल/ट्रॅक, इलेक्ट्रिकल, सिग्नलिंग अँड टेलिकॉम आणि रोलिंग स्टॉक या विभागांमध्ये एकूण 231 जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेतून दहावी उत्तीर्ण असण्यासोबतच संबंधित ट्रेडमधील आयटीआय (ITI) किंवा डिप्लोमा (Diploma) असणे आवश्यक आहे. तसेच शैक्षणिक पात्रता पूर्ण केल्यानंतर उमेदवाराला संबंधित क्षेत्रातील किमान 2 वर्षांचा कामाचा अनुभव असणे बंधनकारक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा 35 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
हे ही वाचा : पुण्यात ऊर्जा निर्मिती प्रकल्पाची इमारत कोसळली, 14 जण अडकून बसले
वेतन किती मिळणार?
निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार दरमहा 35 हजार ते 1 लाख 10 हजार रुपयांपर्यंत आकर्षक वेतनश्रेणी दिली जाईल. उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाईन किंवा विहित नमुन्यात अर्ज करावा लागेल.
हे ही वाचा : डोंबिवली डॉक्टर मारहाण : तिघांना ठोकल्या बेड्या, नगरसेवक रमेश म्हात्रेंना होणार का अटक?
अर्जाची अंतिम तारीख
अर्ज प्रक्रिया 7 जुलै पासून सुरू झाली असून, ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 ऑगस्ट आहे. अर्ज शुल्काचा विचार केला तर, खुल्या प्रवर्गातील (UR), आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) आणि इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांसाठी 400 रुपये शुल्क आकारले जाईल. तर अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि महिला उमेदवारांसाठी कोणतेही अर्ज शुल्क ठेवण्यात आलेले नाही.










