डोंबिवली डॉक्टर मारहाण : तिघांना ठोकल्या बेड्या, नगरसेवक रमेश म्हात्रेंना होणार का अटक?

मिथिलेश गुप्ता

डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. मात्र शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अटक करण्यात आलेली नाही. याविषयी पोलिसांनी काय सांगितले, जाणून घ्या.

ADVERTISEMENT

KDMC Doctor Assault Case
KDMC Doctor Assault Case
Google CTA

बातम्या हायलाइट

point

डोंबिवली डॉक्टर मारहाण

point

तिघांना ठोकल्या बेड्या

point

नगरसेवक रमेश म्हात्रेंना होणार का अटक?

KDMC Doctor Assault Case : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये डॉक्टरांना आणि परिचारिकांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली होती. शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या साथीदारांनी ही मारहाण केली होती. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. याप्रकरणी रुग्णालयातील डॉक्टर वैभव साळुंखे यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. डॉक्टरांवरील या हल्ल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप व्यक्त होत असून, पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तात्काळ कारवाई सुरू केली आहे.

तिघांना अटक

मिळालेल्या माहितीनुसार, या मारहाण प्रकरणाची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी आत्तापर्यंत तीन आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अक्षय कारंडे, रमेश पवार आणि प्रमोद उर्फ प्रकाश निकम अशी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण गुन्ह्यात एकूण 5 आरोपींचा समावेश असून, यामध्ये एका महिला आरोपीचाही समावेश आहे.

हे ही वाचा : '1 कोटी खोटारडे मेल्यानंतरच हे पैदा झाले असतील'; मिसिंग लिंकवरून विधानसभेत CM फडणवीसांचा संताप

रमेश म्हात्रेंना अटक होणार का?

या प्रकरणातील आरोपी आणि शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हात्रे यांनी रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप असून, सध्या पोलीस त्यांच्या अटकेची तयारी करत आहेत. पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, रमेश म्हात्रे यांच्या अटकेची कायदेशीर प्रक्रिया सुरू असून त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल.

हे ही वाचा : ‘एक डॉक्टर म्हणून मी…’, महिला डॉक्टरला मारणाऱ्या शिंदेंच्या नगरसेवकावर श्रीकांत शिंदेंची वक्रदृष्टी

म्हात्रेंनी दिलं स्पष्टीकरण

दरम्यान, याप्रकरणी रमेश म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेत खेद व्यक्त केला. ते म्हणाले की, 'जी मारहाण झाली त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो. मी पूर्ण विश्वासाने सांगतो की मी महिला डॉक्टरवर हात उचलला नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्ये कॅमेऱ्याच्या अँगलमुळं तसं दिसत आहे. जेव्हा आम्ही बोलत होतो, तेव्हा महिला डॉक्टर सतत फोनवर बोलत होत्या आणि आमची तक्रार ऐकून घेत नव्हत्या म्हणून मी हातावर फटका मारला.'
 

हे वाचलं का?