जालना : वाळू माफियाकडून मंडळ अधिकाऱ्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न; घटनेचा व्हिडीओ व्हायरल

Jalna Crime News : मिळालेल्या माहितीनुसार, अंबड तालुक्यातील सुकना नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. त्यानुसार महसूल पथकातील मंडळ अधिकारी कडोस यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन कारवाई सुरू केली. यावेळी एका ट्रॅक्टरमधून बेकायदेशीररीत्या वाळूची वाहतूक होत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले.

Jalna News

Jalna News

मुंबई तक

06 Feb 2026 (अपडेटेड: 06 Feb 2026, 01:06 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

जालना : वाळू माफियाकडून महिला मंडळ अधिकाऱ्यावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न

point

घटनेचा व्हिडीओ समोर

Jalna Crime News : जालना जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात कारवाई करणाऱ्या महसूल प्रशासनावर वाळू माफियांची दहशत पुन्हा एकदा समोर आली आहे. अंबड तालुक्यातील सुकना नदी पात्रात सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपसा आणि वाहतुकीवर कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकातील एका महिला मंडळ अधिकाऱ्यावर थेट ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून प्रशासनाच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, अंबड तालुक्यातील सुकना नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. त्यानुसार महसूल पथकातील मंडळ अधिकारी कडोस यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन कारवाई सुरू केली. यावेळी एका ट्रॅक्टरमधून बेकायदेशीररीत्या वाळूची वाहतूक होत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले.

महसूल अधिकाऱ्यांनी संबंधित ट्रॅक्टर चालकाला वाहन थांबवण्याचा इशारा दिला. मात्र, कारवाईपासून बचाव करण्याच्या उद्देशाने ट्रॅक्टर चालकाने वाहन न थांबवता थेट समोर उभ्या असलेल्या महिला मंडळ अधिकारी कडोस यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने प्रसंगावधान राखत अधिकारी बाजूला झाल्याने मोठी दुर्घटना टळली.

हेही वाचा : बीड : 'अरे पळू नको..', नटून-थटून आलेला नवरदेव भर मंडपातून पळून गेला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

ही संपूर्ण घटना घटनास्थळी उपस्थित असलेल्या व्यक्तीने मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित केली असून, संबंधित व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये ट्रॅक्टर चालकाची बेजबाबदार व दहशत निर्माण करणारी कृती स्पष्टपणे दिसून येत आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील अवैध वाळू माफियांची मुजोरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

दरम्यान, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर थेट जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याने प्रशासन आणि पोलिस यंत्रणेवरही दबाव वाढला आहे. या प्रकरणी संबंधित ट्रॅक्टर चालक आणि वाळू माफियांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. तसेच अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

या घटनेनंतर प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार, दोषींवर कोणती कारवाई केली जाणार आणि अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी कोणती ठोस पावले उचलली जाणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

पुणे: "आय मिस यू दिव्यांशी..." फेसबूक लाइव्ह करत तरुणाने संपवलं जीवन! 'त्या' कारणामुळे उचललं टोकाचं पाऊल
 

    follow whatsapp