Govt Jobs : इंजिनिअरिंग पास उमेदवारांसाठी रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी, लगेच अर्ज करा; 'इतका' मिळणार पगार

मुंबई तक

• 01:27 PM • 16 Apr 2026

RBI मध्ये ज्युनिअर इंजिनिअर पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. पदविका किंवा पदवी प्राप्त केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून, ही संपूर्ण भारत स्तरावरील नोकरीची मोठी संधी मानली जात आहे.

RBI Recruitment

RBI Recruitment

Google CTA

बातम्या हायलाइट

point

इंजिनिअरिंग पास उमेदवारांसाठी रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी

point

लगेच अर्ज करा

point

'इतका' मिळणार पगार

RBI Recruitment : भारतीय रिझर्व्ह बँकेत (RBI) करिअर करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. ज्युनिअर इंजिनिअर पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 07 जागा आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी 04 जागा भरल्या जाणार आहेत. तांत्रिक क्षेत्रातील पदविका किंवा पदवी प्राप्त केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून, ही संपूर्ण भारत स्तरावरील नोकरीची मोठी संधी मानली जात आहे.

हे वाचलं का?

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रतेनुसार, सिव्हिल इंजिनिअरिंग उत्तीर्ण उमेदवाराकडे 65% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि 2 वर्षांचा अनुभव, किंवा 55% गुणांसह पदवी आणि 1 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग उत्तीर्ण उमेदवाराकडे देखील 65% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि 2 वर्षांचा अनुभव, किंवा 55% गुणांसह पदवी आणि 1 वर्षाचा अनुभव अनिवार्य आहे. यामध्ये अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि दिव्यांग (PwBD) उमेदवारांसाठी शैक्षणिक गुणांमध्ये 10 टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात आली आहे.

हे ही वाचा : समजून घ्या: डिलिमिटेशन म्हणजे काय? 'या' राज्यांना नेमकी भीती तरी कसली?

वयोमर्यादा आणि अर्जाचे शुल्क

वयोमर्यादेचा विचार करता, 1 एप्रिल 2026 रोजी उमेदवाराचे वय 20 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे. सरकारी नियमांनुसार, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे, तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षांची शिथिलता देण्यात आली आहे. अर्जासाठी शुल्क म्हणून सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गाला 450 रुपये अधिक 18% जीएसटी भरावा लागेल, तर अनुसूचित जाती, जमाती आणि दिव्यांग उमेदवारांसाठी केवळ 50 रुपये अधिक 18% जीएसटी शुल्क आकारले जाईल.

हे ही वाचा : महालक्ष्मी राजयोग 2026: चंद्र आणि मंगळाच्या युतीमुळे 'या' राशीतील लोकांचे नशीब बदलणार

'इतका' पगार मिळणार

इच्छुक उमेदवारांनी या पदांसाठी www.rbi.org.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 मे 2026 असून, या पदांसाठीची लेखी परीक्षा (tentative) 6 जून 2026 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. या पदावर निवडल्या गेलेल्या उमेदवारांना 47, 700 रुपये इतका पगार मिळणार आहे.