Kolhapur Crime, दीपक सूर्यवंशी : कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यातील दानोळी गावात तरुण व्यावसायिक भरतेश राजगोंडा टोपगोंडा (40) यांच्या अपहरण प्रकरणानं भीषण वळण घेतलंय. 25 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्यानंतर त्यांचा खून झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेने दानोळी परिसरात तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत पोलीसांनी तातडीची कारवाई केली नसल्याचा आरोप भरतेश यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान, सोशल मीडियात या घटनेबाबत वेगळीच माहिती प्रसारित झाली आहे. यामध्ये बॅटरी वापरुन त्यांच्या गुप्तांगाला शॉक दिल्याची माहिती प्रसारित झाली आहे. मात्र ही महिती खरी नसून तपास सुरु असल्याचं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
खंडणीसाठी अपहरण
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात दानोळी येथे सोमवारी (13 एप्रिल) रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी भरतेश राजगोंडा पाटील यांचं अपहरण केलं होतं. अपहरणानंतर त्यांच्याच मोबाईलवरून चुलत भावाला फोन करून 25 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. अपहरणकर्त्यांनी दोन वेळा पैसे आणण्याचे ठिकाण बदलले. भरतेश यांचे दोन मित्र आणि भाऊ महावीर हे सांगितलेल्या ठिकाणी गेले असता पुन्हा फोन आला; मात्र काही वेळात मोबाईल बंद झाला. दरम्यान, पोलीस पाटील प्रशांत नेजकर यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांनी स्वतः शोधमोहीम सुरू केली.
हे ही वाचा : सांगली हादरली, आंतरजातीय लग्न, पण नवऱ्याचे तृतीयपंथीयासोबत संबंध; चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीची हत्या
उसाच्या शेतात सापडली गाडी
गावातील शहरीमळा रस्त्यालगत उसाच्या शेतात भरतेश यांचा मृतदेह तसेच त्यांची गाडी, चप्पल तसेच दुसर्या व्यक्तीचा मफलर आणि नाईट बूट आढळून आले. घटनास्थळी सापडलेल्या या वस्तूंवरून पोलिसांनी संशयाच्या आधारे एका आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले असून भरतेश टोपगोंडा यांचा खून झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी संशयित आरोपीकडून अधिक माहिती घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. या घटनेमुळे दानोळी परिसरात खळबळ उडाली असून आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त होता.
हे ही वाचा : अमरावती : 180 मुली, 350 व्हिडीओ असल्याचा दावा, सत्य काय? मोबाईलमधून कोणी डाऊनलोड केले व्हिडीओ?
आमदारांची घटनास्थळी धाव
आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने काल रात्री 9 वाजता जयसिंगपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र पोलिसांनी सुरुवातीला केवळ मिसिंगची नोंद करून उद्या पाहू अशी भूमिका घेतली, पोलीसांनी वेळीच दखल घेतली असती तर भरतेश वाचला असता असा सूर ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. या खूनानंतर दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
ADVERTISEMENT











