Maharashtra Weather : राज्यावर उष्णतेचं संकट, 'या' जिल्ह्यांतील नागरिकांचं अगं भिजणार घामानं, IMD अलर्ट

मुंबई तक

• 05:00 AM • 15 Apr 2026

Maharashtra Weather : राज्यात उन्हाचा चटका तीव्र जाणवणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच राज्यातील उर्वरित भागांत कोणताही अलर्ट जारी केला नसला तरीही, कोरडं आणि उष्ण हवामानाचा अलर्ट जारी केला. अशातच 15 एप्रिल 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे नमूद केला आहे. 

Maharashtra Weather

Maharashtra Weather

Google CTA

बातम्या हायलाइट

point

राज्यात उन्हाचा चटका तीव्र जाणवणार

point

नागरिकांच्या अंगाची लाही लाही होणार

Maharashtra Weather : राज्यात उन्हाचा चटका तीव्र जाणवणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच राज्यातील उर्वरित भागांत कोणताही अलर्ट जारी केला नसला तरीही, कोरडं आणि उष्ण हवामानाचा अलर्ट जारी केला. अशातच 15 एप्रिल 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे नमूद केला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : भाजप नेता असल्याचा दावा, 16 वर्षीय मुलीवर 19 वेळा लैंगिक अत्याचार अन्...

कोकण 

कोकण विभागात पालघर, ठाणे, रायगड, मुंबई,  रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो. या जिल्ह्यांना हवामान विभागाने उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला. तसेच समुद्रकिनारी आर्द्रता अधिक असल्याने उकाड्यात वाढ होणार असल्याची शक्यता आहे. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांना हवामान विभागाने उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला. यामुळे दुपारी बाहेर पडताना काळजी घ्यावी, असं हवामान विभागाने आवाहन केलं. उर्वरित पश्चिम महाराष्ट्रात देखील उष्णतेत वाढ होणार असल्याची शक्यता आहे. 

मराठवाडा 

मराठवाडा विभागात उन्हाचा चटका अधिक जाणवणार आहे. या विभागात मध्यंतरी अवकाळी पावसाने थैमान घातलं होतं, पण आता अवकाळी पावसाची शक्यता नसल्याने वातावरण कोरडं राहणार आहे. दुपारी नागरिकांनी घराबाहेर पडताना उन्हापासून काळजी घ्यावी. 

हे ही वाचा : 8 व्या वेतन आयोगाच्या कामकाजाला वेग, 'या' उमेदवारांना आयोगात नोकरीची संधी; 90 हजार ते 1 लाखांपर्यंत मिळणार पगार

विदर्भ 

विदर्भात सर्वाधित उष्णता जाणवेल असा हवामान विभागाने शक्यता वर्तवली. या विभागाला उष्णघाताचा धोका वाढण्याची शक्यता आहे. विदर्भासह राज्यातील लोकांच्या अंगाची लाही लाही होणार असल्याची शक्यता आहे.