neet paper leak : हिंगोली येथील एका विद्यार्थ्याने नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या घटनेनंतर आत्महत्या केल्याचा आरोप करत त्याच्या आईने कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांची भेट घेत मदतीची मागणी केली. आपल्या मुलाने नीटची परीक्षा दिल्यानंतर पेपरफुटीची माहिती समजल्यापासून तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाला होता, असा दावा त्यांनी केला. त्या म्हणाल्या की, मुलगा दिवसाला 16 ते 17 तास अभ्यास करत होता आणि डॉक्टर होण्याचे त्याचे स्वप्न होते. पेपरफुटीची माहिती मिळाल्यानंतर त्याने आपला इतका अभ्यास व्यर्थ गेल्याची भावना व्यक्त केली होती. त्यावेळी आपण त्याला पुन्हा एक वर्ष अभ्यास करून परीक्षा देता येईल, असे समजावून सांगितले होते. मात्र त्यानंतर तो शांत राहू लागला, बोलणे कमी झाले आणि त्याने जेवणही सोडल्याचे त्यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
हेही वाचा : सुनावणीत आरोप-प्रत्यारोप, राऊतांचा बाहेर येत इशारा, मागे सरोदे; काय झालं?
पतीचे सहा महिन्यांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
विद्यार्थ्याच्या आईने सांगितले की, त्या हिंगोलीतील एका खासगी रुग्णालयात काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. त्यांचे पती सहा महिन्यांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने निधन पावले. मोठा मुलगा बीएमएसच्या शिक्षणाला लागला असून धाकटा मुलगा नीट परीक्षेची तयारी करत होता. आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याने मदतीच्या अपेक्षेने आपण अभिजीत दीपके यांची भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. शासनाकडून तसेच संबंधित यंत्रणांकडून मदत मिळावी आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत, हीच आपली अपेक्षा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : नागपूर : 16 वर्षीय मुलीला ओलीस ठेवून बलात्कार, 19 वर्षीय नराधमाला अटक; लॉकअपमध्ये पिझ्झाची मागणी
सरकारकडूनही कोणताही संपर्क किंवा मदतीचा प्रस्ताव आलेला नसल्याचा दावा
त्यांनी असा दावाही केला की, मुलाच्या मृत्यूनंतर आपण स्थानिक आमदार संतोष बांगर यांची भेट घेतली होती. तसेच खासदारांनाही संपूर्ण घटना सांगितली होती. मात्र दोघांकडूनही केवळ "बघू, काहीतरी करू" असे आश्वासन मिळाले, त्यानंतर कोणतीही ठोस मदत किंवा नुकसानभरपाई मिळाली नाही. सरकारकडूनही कोणताही संपर्क किंवा मदतीचा प्रस्ताव आलेला नसल्याचा दावा त्यांनी केला. आपल्या मुलाचे नाव सुशील विलास ढगी असल्याचेही त्यांनी सांगितले.
या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करताना अभिजीत दीपके यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्याच्या आईने आपली व्यथा मांडली. त्यावेळी संबंधित घटनाक्रमाचा उल्लेख करत, विद्यार्थ्याच्या आईच्या म्हणण्यानुसार मुलाच्या आत्महत्येनंतर त्यांनी लोकप्रतिनिधींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांच्या म्हणण्यानुसार त्याची दखल घेतली गेली नाही. जवळपास एक महिना उलटल्यानंतरही सरकार, आमदार किंवा खासदारांकडून कोणतीही मदत मिळालेली नसल्याचा त्यांचा दावा आहे. त्यामुळे न्याय आणि मदतीच्या अपेक्षेने त्यांनी अभिजीत दीपके यांची भेट घेतली असून, पुढे या प्रकरणात कोणती भूमिका घेतली जाते याकडे लक्ष लागले आहे.
ADVERTISEMENT












