Rent A Garba Partner News : नवरात्री सुरू होण्याआधी सोशल मीडियावर ‘Rent A Garba Partner’ गरबा खेळण्यासाठीचा साथीदार भाडेतत्त्वावर मिळणार असल्याची एक पोस्ट व्हायरल होते. मुंबई, अहमदाबादसह सूरतपर्यंत ही पोस्ट व्हायरल झाली आहे. संबंधित सोशल मिडिया अकाउंट्स देखील समोर आली आहेत. पोलिसांनी या घटनेचा पुढील तपास देखील केला आहे. अखेर या प्रकरणामागे नेमकं कोण आहे? असा प्रश्न उपस्थित होत असून यामागील नेमके कारण काय? तसेच नेमका हेतू काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : मीरा भाईंदर: डब्ब्यात मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड, मनसे आक्रमक
पोस्टमध्ये गोल्डन, प्लॅटेनियम पॅकेज
व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये गोल्डन, प्लॅटेनियम पॅकेज बनवण्यात आली आहेत. एका पोस्टमध्ये 1 हजार रुपये ते 2 हजार रुपयांचे पॅकेज नमूद करण्यात आलेत. अशातच एका व्हायरल झालेल्या पोस्टरमध्ये 3 हजार रुपये ते 6 हजार 500 रुपये पर्यंतचे पॅकेज असल्याची माहिती दिली. यात दोन तासांपासून ते संपूर्ण रात्रीपर्यंतच्या सेवांमध्ये गरबा जोडीदार, नृत्याचे धडे, सारखे कपडे, सेल्फी, इंस्टाग्राम रील्स आणि फोटो यांचा समावेश असतो. काही पोस्टमध्ये 'कपाळावरचे चुंबन', रात्री उशिरा जेवायला बाहेर जाणे आणि अगदी घरी सोडणे असा उल्लेख केला होता.
अकाउंट हॅक करून आर्थिक फसवणुकीचा उद्देश तर नसेल ना?
अहमदाबाद साइबर क्राइम पोलिसांनी सोशल मीडियाच्या अकाउंट हॅक करून आर्थिक फसवणुकीचा उद्देश तर नसेल ना? असा प्रश्न उपस्थित केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, काही पोस्ट व्यक्तींच्या सोशल मीडिया अकाउंटच्या पोस्टवरून शेअर करण्यात आली. तर काही अकाउंट्सला AI चे फोटो बनवून लावण्यात आले होते.
हे ही वाचा : शाळेत प्रियकराने शिक्षिकेवर केला गोळीबार, नंतर स्वत:ला देखील संपवलं
मुंबईत नवरात्रोत्साठी हे प्रकरण अधिकच गंभीर होऊन गेलं आहे. भाजपचे आमदार संजचय उपाध्याय यांनी मुंबई पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती. त्यांनी सोशल मीडिया आणि डेटिंग अॅप्सवर काही लोक तिथे उपस्थित होते. आयोजकांचा तपास करण्याची मागणी केली जात आहे.
ADVERTISEMENT












