SBI Clerk Recruitment : भारतीय स्टेट बँकेने (SBI) लिपीक (ज्युनिअर असोसिएट - ग्राहक सहाय्य आणि विक्री) पदाच्या एकूण 1538 जागांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. एकूण जागांपैकी अनुसूचित जातीसाठी 207, अनुसूचित जमातीसाठी 1219 आणि इतर मागासवर्गासाठी 112 जागा राखीव आहेत. या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांना केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज प्रक्रिया 7 ऑगस्ट पासून सुरू झाली असून 27 ऑगस्ट अर्ज करण्याची आणि शुल्क भरण्याची अंतिम तारीख आहे. उमेदवारांना sbi.bank.in या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज सादर करता येईल.
ADVERTISEMENT
शैक्षणिक पात्रता काय?
या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. निवड प्रक्रियेमध्ये पूर्व परीक्षा (Preliminary Exam), मुख्य परीक्षा (Main Exam) आणि आवश्यकतेनुसार स्थानिक भाषा प्राविण्य चाचणी (Local Language Proficiency Test) या तीन टप्प्यांचा समावेश असेल. ऑनलाईन पूर्व परीक्षा संभाव्यतः सप्टेंबर 2026 मध्ये घेतली जाईल, तर मुख्य परीक्षा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर 2026 मध्ये आयोजित केली जाण्याची शक्यता आहे. ही भरती देशातील 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी असून उमेदवारांना त्यांनी निवडलेल्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशानुसार नियुक्ती दिली जाईल.
हे ही वाचा : राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या खेळाडूला ताटकळत ठेवल्याची चर्चा, आता राज ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण
अर्जाचे शुल्क किती?
अर्जाच्या शुल्काबाबत बोलायचे झाल्यास, अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), दिव्यांग (PwBD) आणि माजी सैनिक (XS/DXS) प्रवर्गातील उमेदवारांसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही. तर इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गातील उमेदवारांसाठी 750 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. भरती प्रक्रियेतील सर्व अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार ऑनलाईन अर्ज भरताना आपले शुल्क जमा करणे बंधनकारक राहील.
हे ही वाचा : नवरा ICU मध्ये, नवऱ्याचा मृत्यू...,स्मशानभूमीत पहारा; प्रेमविवाहाचा भयानक अंत
पगार किती मिळणार?
निवड झालेल्या ज्युनिअर असोसिएट्ससाठी वेतनश्रेणी रु. 24,050 ते रु. 64,480 दरम्यान असेल. पदवीधर उमेदवारांना दोन अतिरिक्त वेतनवाढीसह सुरुवातीचे मूळ वेतन (Starting Basic Pay) रु. 26,730 दिले जाईल. मुंबईसारख्या महानगरांमध्ये महागाई भत्ता (DA) आणि इतर प्रचलित भत्त्यांसह सुरुवातीचे एकूण मासिक वेतन (Total Starting Emoluments) सुमारे 46,000 रुपये प्रतिमहिना असेल. बँक क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या आणि पात्र असणाऱ्या आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची आणि सुवर्णसंधी मानली जात आहे.
ADVERTISEMENT












