PDCC Recruitment : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (PDCC) वतीने 'शिपाई' पदासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 289 जागा भरल्या जाणार असून बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. पुणे जिल्ह्यात नोकरी मिळवण्याचा हा चांगला मार्ग असून पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन बँकेकडून करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
पात्रतेचे निकष काय?
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता किमान 12 वी उत्तीर्ण किंवा समतुल्य डिप्लोमा असावी. यासोबतच सर्वात महत्त्वाची अट म्हणजे उमेदवार हा पुणे जिल्ह्याचा किमान 15 वर्षांपासूनचा स्थानिक रहिवासी असावा. वयोमर्यादेचा विचार केल्यास, 1 ऑगस्ट 2026 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. या अटी पूर्ण करणारे उमेदवार या भरतीप्रक्रियेसाठी पात्र मानले जातील.
हे ही वाचा : भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात BJP चा पराभव का झाला?
अर्जाचे शुल्क किती?
या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातूनच अर्ज सादर करावा लागेल, इतर कोणत्याही मार्गाने आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 1650 रुपये परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे. पात्र उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांना पुणे जिल्ह्यातच वेगवेगळ्या शाखांमध्ये नियुक्ती दिली जाईल.
हे ही वाचा : लग्न होत नाही म्हणून आईनं पोटच्या लेकीला संपवलं, धाकटी बहीण होती सामील
अर्जाची अंतिम मुदत
या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे मुदतीपूर्वी उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज सादर करणे गरजेचे आहे. भरतीबाबतची अधिक सविस्तर माहिती, अटी व ऑनलाईन अर्जाची लिंक बँकेच्या www.punedccbank.com या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे.
ADVERTISEMENT












