Maharashtra Weather : राज्यातील काही भागांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात येतेय, तर काही वेळा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे. विविध भागांत वातावरणात बदल जाणवतोय. जाणून घ्या 4 ऑगस्ट 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज हा पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आलीय.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : बिहारमध्ये प्रशांत किशोर यांचा मोठा विजय, भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरूंग
कोकण
कोकण विभागातील ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळेल असा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रात धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे. जळगाव, अहिल्यानगर आणि नाशिकमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. नाशिक घाटमाथा परिसरात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर घाटमाथा परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा यलो अलर्ट वर्तविण्यात आलाय.
मराठवाडा
मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या जिल्ह्यांना हवामान विभागाने हलक्या पावसाचा अंदाज वर्तवविला आहे. परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
हे ही वाचा : पिक्चरमध्ये काम देण्याचा बहाणा, हॉटेलवर बोलावून गुंगीचं औषध मिसळत अत्याचार
विदर्भ
विदर्भाच्या अकोला, अमरावती, बुलढाणा आणि वाशिम या तीन जिल्ह्यांत कोणत्याही हवामानाचा कोणाताही अंदाज वर्तविलेला नाही. यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि भंडाला या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाचा यलो अलर्ट अंदाज वर्तविलेला आहे.
ADVERTISEMENT












