पिक्चरमध्ये काम देण्याचा बहाणा, हॉटेलवर बोलावून गुंगीचं औषध मिसळत अत्याचार

मुंबई तक

crime news : चित्रपटात काम देण्याच्या नावाखाली हॉटेलमध्ये बोलावलं होतं, नंतर लैंगिक शोषण केल्याचा आरोप तरुणीने केला होता. पोलीस या प्रकरणाचा शोध घेत आहेत.

ADVERTISEMENT

crime news
crime news
Google CTA

बातम्या हायलाइट

point

चित्रपटात काम देण्याच्या नावाखाली हॉटेलमध्ये बोलावलं

point

कोल्ड्रिंकमध्ये नशेचे पदार्थ मिसळून पीडितेला पाजलं

Crime News : चित्रपटात काम देण्याच्या नावाखाली हॉटेलमध्ये बोलावलं होतं, नंतर लैंगिक शोषण केल्याचा आरोप तरुणीने केला होता. पोलीस या प्रकरणाचा शोध घेत आहेत. ही घटना उत्तर प्रदेशातील अलीगढ येथील असून बन्नादेवी पोलीस ठाणे क्षेत्रातील कासगंज येथील आहे. या घटनेनं परिसर हादरून गेल्याचं वृत्त समोर आले. आरोपीची   वासीम अशी ओळख समोर आली आहे.  

हे ही वाचा : चंद्रपुरात पुरूषानं घेतला तंत्र मंत्राचा आधार, महिलेला शेजारच्यासोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडलं

कोल्ड्रिंकमध्ये नशेचे पदार्थ मिसळून पीडितेवर अत्याचार 

संबंधित प्रकरणात पीडितेनं पोलिसांना सांगितलं की, 31 जुलै रोजी एका तरुणाचा फोन आला होता. त्या तरुणाने चित्रपटात काम करत असल्याचं आमिष दाखवून तिला एका हॉटेलमध्ये बोलावलं होतं. त्याच ठिकाणी कोल्ड्रिंकमध्ये नशेचे पदार्थ मिसळून पीडितेला प्यायला दिलं आणि नंतर तिच्यावर अत्याचार केला. 

पीडितेला मारहाण केल्याचा आरोप 

पीडितेनं या घटनेचा विरोध केला असता, मारहाण करण्यात आली होती. सीओ द्वितीय धनंजय सिंह यांनी सांगितलं की, या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. याच आधारावर पुढील कारवाई करण्यात आली होती. गुन्हेगारी गुप्तचर यंत्रणेनं गाझियाबादच्या अंकुर विहार परिसरातून गँगस्टर कायद्यांतर्गत आरोपीला अटक केली. 

हे ही वाचा : मिर्ची तोडण्याचा बहाणा, 50 वर्षीय नराधमाकडून 9 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; आई-वडिलांना मारहाणीची धमकी

दरम्यान, सिव्हिल लाइन्सचे पोलीस कॉन्स्टेबल सर्वम सिंग यांनी सांगितलं की, इस्लामनगर, नगला पटवारी येथील रहिवासी वासीम विरोधात सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, हल्ला, शस्त्र कायदा, एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.