Maharashtra Weather : राज्यात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कुठे यलो अलर्ट तर कुठे ऑरेंज अलर्टचा अंदाज आहे. काही ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. घाटमाथा परिसरात पावसाची शक्यता असून 3 ऑगस्ट 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आलाय.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : चॅनेल बदलण्यावरून वाद, पत्नीने नवऱ्यावर विळ्याने हल्ला करत.. भयंकर घडलं
कोकण
कोकणातील पालघर आणि रत्नागिरीत मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. ठाणे, मुंबईमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नंदुरबारमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. जळगाव या जिल्ह्यात हलक्या पावसासह विजांचा कडकडाट जाणवण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता असून नाशिक घाटमाथा परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस असेल असा हवामान विभागाने अंदाज जारी केलाय.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रात सातारा घाटमाथा परिसर, पुणे घाटमाथा परिसरात मुसळधार ते अतिमुळधार पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे. कोल्हापूर घाटमाथा परिसरात मध्यम स्वरुपाचा पाऊस जाणवेल. कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. सांगली जिल्ह्यात हलका पाऊस राहील.
मराठवाडा
मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. जालना आणि हिंगोलीत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित असेल.
हे ही वाचा : 16 वर्षीय मेहुणीवर दाजीकडून लैंगिक अत्याचार, नात्याला काळिमा फासणारा प्रकार
विदर्भ
अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा येथे एक-दोन ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा यलो अलर्ट आहे. बुलढाणा, नागपूर, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत कोणताही अलर्ट जारी करण्यात आला नाही.
ADVERTISEMENT












