RRB Recruitment : रेल्वे भरती बोर्डाद्वारे (RRB) देशभरातील उमेदवारांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. ज्युनिअर इंजिनिअर (JE), डेपो मटेरियल सुपरिटेंडंट आणि केमिकल व मेटलर्जिकल असिस्टंट या विविध पदांच्या एकूण 4098 जागांसाठी ही मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना 7 व्या वेतन आयोगानुसार 'लेव्हल-6' चे वेतनमान मिळणार असून, सुरुवातीचा मूळ पगार दरमहा 35,400 रुपये असणार आहे. संपूर्ण भारतात कुठेही नोकरी करण्याची तयारी असलेल्या पात्र आणि इच्छुकांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे.
ADVERTISEMENT
शैक्षणिक पात्रता काय?
या भरतीसाठी पदांनुसार शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. ज्युनिअर इंजिनिअर पदासाठी सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, संगणक शास्त्र, माहिती तंत्रज्ञान यांसह इतर संबंधित शाखांमधील इंजिनिअरिंग डिप्लोमाधारक पात्र असणार आहेत. डेपो मटेरियल सुपरिटेंडंट पदासाठी कोणत्याही शाखेतील इंजिनिअरिंग डिप्लोमा आवश्यक आहे, तर केमिकल व मेटलर्जिकल असिस्टंट पदासाठी भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र (Physics/Chemistry) विषयासह किमान 45% गुणांनी बी.एससी (B.Sc) उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. यासोबतच उमेदवारांना संबंधित पदासाठी आवश्यक असलेली वैद्यकीय पात्रता (Medical Standards) पूर्ण करावी लागेल.
हे ही वाचा : मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर खंडणीचे गुन्हे, परीक्षा केंद्रात घुसून विद्यार्थ्यांची झडती
'असा' करा अर्ज
उमेदवारांचे वय 1 जानेवारी 2027 रोजी 18 ते 33 वर्षांच्या दरम्यान असावे. शासकीय नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सूट देण्यात आली असून SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे, तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षांची सूट सवलत म्हणून लागू राहील. परीक्षेच्या अर्जासाठी General, OBC आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांना 500 रुपये शुल्क भरावे लागेल, तर SC, ST, माजी सैनिक, ट्रान्सजेंडर, EBC आणि महिला उमेदवारांसाठी 250 रुपये परीक्षा शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
हे ही वाचा : नागपूर: 16 वर्षीय मुलीवर अत्याचार, आरोपीकडून तुरूंगातून पिज्जा बर्गरची मागणी, म्हणाला..
अंतिम मुदत
या भरतीसाठी उमेदवारांना केवळ ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज सादर करायचे आहेत. अर्ज करण्याची सुरुवात 14 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. अर्जाची संपूर्ण प्रक्रिया अधिकृत संकेतस्थळावर (www.rrbapply.gov) पार पडणार असून ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 13 सप्टेंबर 2026 आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी मुदतीपूर्वी आणि अधिकृत जाहिरातीमधील सर्व अटी व शर्तींची व्यवस्थित पडताळणी करून लवकरात लवकर अर्ज पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT












