मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेते प्रविण तरडे यांनी त्यांच्या सुपरहिट 'देऊळ बंद-2' चित्रपटाबाबत मोठी घोषणा केली आहे. चित्रपटाला प्रदर्शित होऊन 75 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली.
ADVERTISEMENT
प्रविण तरडे यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे,
देऊळ बंद-2... काल 75 दिवस पूर्ण झाले... आज सिनेमा सर्व चित्रपटगृहातून काढत आहेत... तुम्ही दिलेल्या यशाबद्दल कायम तुमच्या ऋणात...
या शब्दांत त्यांनी प्रेक्षकांचे मनापासून आभार मानले.
हे ही वाचा>> Gen Z सह सर्वांनी ऐकावं असं IAS तुकाराम मुंढेंचं खणखणीत भाषण!
'देऊळ बंद-3'ची अधिकृत घोषणा
याच पोस्टमध्ये प्रविण तरडे यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली. त्यांनी लिहिले,
"लवकरच 'देऊळ बंद-3' घेऊन पुन्हा भेटायला येऊ."
या एका वाक्यामुळे 'देऊळ बंद' मालिकेच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. चित्रपटाचा तिसरा भाग येणार असल्याचे संकेत मिळाल्याने सोशल मीडियावर चाहत्यांकडून शुभेच्छा आणि उत्सुकतेच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
75 दिवसांचा यशस्वी प्रवास
'देऊळबंद-2'ने प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली. अनेक चित्रपटगृहांमध्ये सलग 75 दिवस चित्रपट सुरू राहिला. आता हा चित्रपट थिएटरमधून उतरवण्यात येत असला तरी प्रेक्षकांनी दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल प्रविण तरडे यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
हे ही वाचा>> 'माझं पुण्याशी 76 वर्षांपूर्वीचं नातं, दर मंगळवारी मी...', अजित डोवालांनी पुण्याविषयी नेमकं सांगितलं तरी काय?
चाहत्यांची वाढली उत्सुकता
'देऊळबंद-3'ची घोषणा होताच सोशल मीडियावर चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. आता तिसऱ्या भागाची कथा काय असेल, कलाकार कोण असतील आणि चित्रपट कधी प्रदर्शित होणार, याबाबतची उत्सुकता वाढली आहे. मात्र, याबाबतची सविस्तर माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
ADVERTISEMENT












