मुंबई : ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू, गोरेगावात लाईव्ह कॉन्सर्टमध्ये धक्कादायक प्रकार, पाच जण अटकेत

मुंबई तक

• 01:32 PM • 14 Apr 2026

गोरेगावमध्ये आयोजित एका कॉन्सर्ट दरम्यान ड्रग्जच्या अतिसेवनामुळे दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. दोघंही मुंबईतील नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत होते.

Mumbai News

Mumbai News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मुंबई : ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू,

point

गोरेगावात लाईव्ह कॉन्सर्टमध्ये धक्कादायक प्रकार,

point

पाच जण अटकेत

Mumbai News : मुंबईतील गोरेगाव (पूर्व) येथील नेस्को सेंटरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे आयोजित एका लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान ड्रग्जच्या अतिसेवनामुळे दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. 11 एप्रिलच्या सायंकाळी ही धक्कादायक घटना घडली.

हे वाचलं का?

अमली पदार्थाचे सेवन

मिळालेल्या माहितीनुसार, या कॉन्सर्टमध्ये सुमारे 3 ते 4 हजार तरुण-तरुणी सहभागी झाले होते. कार्यक्रमादरम्यान काही तरुणांनी अमली पदार्थ आणि मद्याचे मोठ्या प्रमाणात सेवन केले होते. यामुळे त्यांची प्रकृती अचानक खालावली. आयोजकांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप होत आहे.

हे ही वाचा : थेट पंचायत समिती कार्यालयात घुसली महिला अन् थेट घातला अधिकाऱ्याच्या कॉलरला हात..

उपचारादरम्यान विद्यार्थ्यांचा मृत्यू

मृत झालेले विद्यार्थी एका नामांकित महाविद्यालयात शिकत होते. घटनेनंतर लगेचच त्यांना उपचारासाठी ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत आणखी एका विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर असून, सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हे ही वाचा : ‘जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना कर्कश्य डीजे लावून..’, बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिवशी राज ठाकरेंची पोस्ट

पाच जणांना अटक

या प्रकरणी वनराई पोलिसांनी तातडीने कारवाई करत गुन्हा दाखल केला असून, आतापर्यंत 5 जणांना अटक केली आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, कॉन्सर्टमध्ये ड्रग्जचा पुरवठा नेमका कोणी केला, याचा शोध घेतला जात आहे.