थेट पंचायत समिती कार्यालयात घुसली महिला अन् थेट घातला अधिकाऱ्याच्या कॉलरला हात..
Kolhapur: करवीर पंचायत समितीमध्ये बचत गटासंदर्भात माहिती घेण्यासाठी आलेल्या महिला आणि अधिकाऱ्यांमध्ये जोरदार वादावादी झाली आणि प्रकरण पोचलं थेट पोलीस ठाण्यापर्यंत.
ADVERTISEMENT

कोल्हापूर: कोल्हापुरातील करवीर पंचायत समितीमध्ये बचत गटासंबंधी माहिती घेणाऱ्या दिपा घारगे या महिलेचा पाणी पुरवठा विभागातील अनुप पाटील यांच्यासोबत वाद झाला. या दोघांतील वादाचं पर्यवसन हाणामारीपर्यंत गेलं. अखेर लक्ष्मीपूरी पोलिसांनी पंचायत समितीमध्ये धाव घेतली. तक्रार करण्यासाठी दोन्ही पक्ष पोलीस ठाण्यात दाखल झाले. मात्र, निरीक्षक कन्हेरकर यांनी दोघांची समजूत घालून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
नेमका राडा कशामुळे झाला?
आपल्याला न्याय मिळत नसल्याच्या भावनेतून घारगे यांनी बैठकीतून उठून,थेट पोलीस अधीक्षक कार्यालयाकडं धाव घेतली. दरम्यान, पोलीस ठाण्याबाहेर मात्र पंचायत समितीचे कर्मचारी आणि बचत गटांच्या महिलांनी मोठी गर्दी केली होती.
हे ही वाचा>> पंढरपूर हादरले, 21 वर्षीय तरुणीवर अॅसिड हल्ला, पाणीपुरी खाण्यासाठी आलेली तरुणी विव्हळू लागली अन्..
कोल्हापूर जिल्हा हातकणंगले तालुक्यातील दिपा घारगे या महिला गारमेंटचा व्यवसाय करतात. बचत गटांच्या माध्यमातून त्या महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम करतात. आज त्या करवीर पंचायत समितीमध्ये माहिती घेण्यासाठी आल्या होत्या. प्रकाश लाड या अधिकाऱ्याकडून त्या माहिती घेत होत्या. दरम्यान पाणी पुरवठा विभागातील अनुप पाटील हे त्या ठिकाणी आले. त्यांनी प्रकाश लाड यांना काम आहे, ताबडतोब आपल्याबरोबर येण्यास सांगितलं.
त्यावेळी दिपा घारगे यांनी त्यांना रोखलं. कामाची पूर्तता झाल्यानंतर त्यांना घेऊन जा, तसंच तुम्ही कोण, तुमचं ओळखपत्र दाखवा, अशी अनुप पाटील यांना विचारणा केली. त्यातून अनुप पाटील यांनी, संबंधित महिलेवर राग काढत, तू कोण विचारणार?, अशी विचारणा केली. त्यातून दिपा घारगे आणि अनुप पाटील यांच्यात शाब्दिक वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन तिथं शिवीगाळ, धक्काबुक्की आणि कॉलरला हात घालण्यापर्यंत मजल गेली.









