पंढरपूर हादरले, 21 वर्षीय तरुणीवर अॅसिड हल्ला, पाणीपुरी खाण्यासाठी आलेली तरुणी विव्हळू लागली अन्..
Pandharpur Crime News : पंढरपूर शहरात 21 वर्षीय तरुणीवर अज्ञाताने ॲसिड हल्ला केल्याने खळबळ उडाली असून, गंभीर जखमी अवस्थेत तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पंढरपूर हादरले, 21 वर्षीय तरुणीवर अॅसिड हल्ला
पाणीपुरी खाण्यासाठी आलेली तरुणी विव्हळू लागली अन्..
Pandharpur Crime News : पंढरपूर शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली असून, विठ्ठलाच्या पावन नगरीत एका 21 वर्षीय तरुणीवर भरदिवसा ॲसिड हल्ला करण्यात आला आहे. वैष्णवी सुदाम भागवत असे या दुर्दैवी तरुणीचे नाव असून, ती पंढरपूर शहराच्या मध्यवस्तीत पाणीपुरी खाण्यासाठी आली असताना हा प्रकार घडला. यावेळी एका अज्ञात हल्लेखोराने अचानक वैष्णवीच्या जवळ येऊन तिच्यावर ॲसिड फेकले आणि क्षणात तिथून पळ काढला. या अनपेक्षित आणि अमानुष कृत्यामुळे संपूर्ण पंढरपूर शहर हादरून गेले असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. शहराच्या मुख्य बाजारपेठेत आणि गर्दीच्या ठिकाणी अशी घटना घडल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले असून, या हल्ल्याने कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
भरवस्तीत अमानुष कृत्य आणि नागरिकांचे प्रसंगावधान
हा भीषण हल्ला झाल्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला आणि वैष्णवी वेदनेने विव्हळू लागली. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांनी मोठे प्रसंगावधान राखले आणि तातडीने वैष्णवीला मदतीसाठी हात दिला. नागरिकांनी तिला जवळच्याच एका खासगी रुग्णालयात तातडीने उपचारासाठी दाखल केले. सध्या वैष्णवीची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. ॲसिड हल्ल्यामुळे तिच्या शरीराच्या काही भागाला मोठी इजा झाली असून, तिच्या डोळ्यांना नेमकी किती इजा झाली आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. या घटनेची माहिती मिळताच रुग्णालय परिसरात वैष्णवीच्या नातेवाईकांनी आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली असून सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.
पोलीस तपास आणि सीसीटीव्ही फुटेजचा आधार









