Maharashtra Weather : वातावरण फिरलं, 'या' जिल्ह्यांत वादळीवाऱ्यासह पाऊस घालणार धुमाकूळ

मुंबई तक

• 05:00 AM • 09 Aug 2026

Maharashtra Weather : कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता जाणवेल. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस थैमान घालण्याची शक्यता आहे. 

Maharashtra Weather

Maharashtra Weather

Google CTA

बातम्या हायलाइट

point

राज्यात पावसाचे वातावरण कायम

point

9 ऑगस्ट रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे... 

Maharashtra Weather : राज्यात पावसाचे वातावरण कायम राहणार असून काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता जाणवेल. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस थैमान घालण्याची शक्यता आहे. जाणून घ्या 9 ऑगस्ट रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे... 

हे वाचलं का?

हे ही वाचा : शिक्षण, बेरोजगारी, डेटा आणि AI वरून राहुल गांधींनी RSS सह सरकारला चांगलंच फटकारलं

कोकण 

कोकणतील पालघर, ठाणे आणि मुंबईमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा अंदाज आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांत मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असून सिंधुदुर्गात मध्यम स्वरुपाचा मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. 

उत्तर महाराष्ट्र 

या विभागातील धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे. तर नाशिक घाटमाथा परिसरात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. पुणे घाटमाथा आणि सातारा घाटमाथा परिसरात मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. 

मराठवाडा 

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे. नांदेड, हिंगोली, परभणी येथे हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तविलाय. 

हे ही वाचा : डोंबिवलीत डॉक्टरांना मारहाण प्रकरणात शिंदेंच्या नगरसेवकाला जामीन, उच्च न्यायालयाकडून 'त्या' अटी

विदर्भ 

विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यात पावसाचा कोणताही अलर्ट वर्तविलेला नाही. नागपूर आणि गोंदिया या दोन जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्टचा अंदाज वर्तविण्यात आलाय.