Govt Jobs : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना चांगली संधी चालून आली आहे. केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये ही भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) द्वारे देशभरातील विविध पदांसाठी 3003 जागांची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीसाठी 10 वी, 12 वी उत्तीर्ण तसेच पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता आणि इतर निकष तपासून लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
ADVERTISEMENT
'अशी' असेल वयोमर्यादा
या भरतीसाठी वयोमर्यादा 1 जानेवारी 2026 रोजी 18 ते 25, 27, 28 किंवा 30 वर्षे अशी पदांनुसार निश्चित करण्यात आली आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी सरकारी नियमांनुसार सवलत देण्यात आली असून, यामध्ये SC/ST उमेदवारांना 5 वर्षे, तर OBC उमेदवारांना 3 वर्षांची वयोमर्यादा सूट लागू असेल.
हे ही वाचा : मुंबई : ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू, गोरेगावात लाईव्ह कॉन्सर्टमध्ये धक्कादायक प्रकार, पाच जण अटकेत
'असा' करा अर्ज
अर्ज शुल्क म्हणून जनरल आणि OBC उमेदवारांना 100 रुपये भरावे लागणार आहेत, तर SC/ST, PWD, माजी सैनिक आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज पूर्णपणे विनामूल्य आहेत. ही संपूर्ण भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पडणार असून, इच्छुक उमेदवारांना एसएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर (ssc.gov.in) जाऊन अर्ज सादर करायचे आहेत.
हे ही वाचा : थेट पंचायत समिती कार्यालयात घुसली महिला अन् थेट घातला अधिकाऱ्याच्या कॉलरला हात..
अर्जाची शेवटची तारीख
या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 मे 2026 (रात्री 11 वाजेपर्यंत) असून, त्यानंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. या भरतीची लेखी परीक्षा जून 2026 मध्ये घेतली जाणार आहे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असल्याने देशभरातील पात्र उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.
ADVERTISEMENT











