अमरावती : '18-19 वर्षांच्या मुली रात्री उशिरापर्यंत थांबायच्या..,' 'त्या' बिल्डिंगमधील रहिवाशांचा खळबळजनक खुलासा

या संपूर्ण प्रकरणाचे मुख्य केंद्र होता एक फ्लॅट. अमरावती शहरातील कटोरा नाका परिसराजवळ असलेल्या 'कमल रेसिडेन्सी'मध्ये हा फ्लॅट आहे. याच फ्लॅटमध्ये आरोपी अयान मुलींचं शोषण करायचा.

Amravati Video Scandal

Amravati Video Scandal

मुंबई तक

16 Apr 2026 (अपडेटेड: 16 Apr 2026, 05:18 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

अमरावती : '18-19 वर्षांच्या मुली रात्री उशीरापर्यंत थांबायच्या..,'

point

'त्या' बिल्डिंगमधील रहिवाशांचा खळबळजनक खुलासा

Amravati Video Scandal, धनंजय साबळे : अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे समोर आलेल्या व्हिडिओ स्कँडलचा तपास जसा पुढे सरकत आहे, तसे नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. या संपूर्ण प्रकरणाचे मुख्य केंद्र होता एक फ्लॅट. अमरावती शहरातील कटोरा नाका परिसराजवळ असलेल्या 'कमल रेसिडेन्सी'मध्ये हा फ्लॅट आहे. याच फ्लॅटमध्ये आरोपी अयान मुलींचं शोषण करायचा.

हे वाचलं का?

स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, हा फ्लॅट इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आहे. अयान येथे दिवस-रात्र बिनदिक्कतपणे मुलींना घेऊन येत-जात असे. त्याच इमारतीत दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या एका फ्लॅट मालकाने 'आजतक'शी बोलताना अनेक महत्त्वाचे खुलासे केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, येथे अनेकदा 18-19 वर्षांच्या मुली येत असत आणि उशिरापर्यंत थांबत असत. याबाबत संशय आल्याने आम्ही फ्लॅटच्या मालकिणीला माहिती दिली होती, मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

कुलूप लावून फरार झाला व्यक्ती

स्थानिकांनी पुढे बोलताना सांगितले की, येणारे तरुण-तरुणी आपली ओळख लपवण्यासाठी कधी बुरखा तर कधी दुपट्ट्याचा वापर करत असत, ज्यामुळे त्यांची ओळख पटवणे कठीण व्हायचे. नुकतीच जेव्हा पोलीस टीम या फ्लॅटवर पोहोचली, तेव्हा या प्रकरणाला एक वेगळे वळण मिळाले. पोलिसांच्या येण्यापूर्वीच तिथे राहणारा मानव नावाचा व्यक्ती कुलूप लावून फरार झाला होता. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. 

हे ही वाचा : 15 वर्षीय चुलत भावाने साडे तीन वर्षांच्या चुलत बहिणीला सोडलं नाही, आई बाहेर गेल्यानंतर नको तेच... गुप्तांगाला झाली जखम

'फ्लॅट मालकालाही आरोपी करा'

या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या व्यक्तीने याप्रकरणी कडक कारवाईची मागणी केली असून, अशा कृत्य करणाऱ्यांवर कठोर ॲक्शन घेण्याची मागणी केली आहे. फ्लॅट मालकालाही यात आरोपी केले पाहिजे, कारण वारंवार सूचना देऊनही त्यांनी कोणतेही पाऊल उचलले नाही; कदाचित त्यांचाही या प्रकरणात सहभाग असावा, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. अशा घटनांमुळे चांगल्या सोसायटीतील वातावरण खराब होते आणि लहान मुलांवरही याचे चुकीचे परिणाम होऊ शकतात, असेही त्यांनी नमूद केले. सध्या पोलिसांनी हा फ्लॅट आपल्या ताब्यात घेतला आहे. याच फ्लॅटला या संपूर्ण स्कँडलचा मुख्य अड्डा मानले जात आहे, जिथे कथितपणे अश्लील व्हिडिओ बनवले जात होते.

हे ही वाचा : 'तुमची मुलगी गरोदर...', पोटात येऊ लागल्या कळा, नराधमाकडून 14 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

8 पीडितांची ओळख पटली

दरम्यान, अमरावती ग्रामीण पोलिसांनी परतवाडा-अचलपूर क्षेत्राशी संबंधित या खळबळजनक सेक्स स्कँडलमध्ये मोठी कारवाई करत अयान अहमद, उजैर खान, मोहम्मद साद आणि तरबेज खान या चार आरोपींना अटक केली आहे. हे लोक शहरात भाड्याने खोली घेऊन तिथे तरुणींना बोलावून त्यांचे शोषण करायचे आणि अश्लील व्हिडिओ बनवायचे, असा त्यांच्यावर आरोप आहे. आतापर्यंत 8 पीडितांची ओळख पटली असून इतरांचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी 47 सदस्यांचे विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे.

तपासादरम्यान असे समोर आले की, मुख्य आरोपीने शहरात एक खोली भाड्याने घेऊन या काळ्या कृत्याचा अड्डा बनवला होता. याच ठिकाणी पीडितांना बोलावले जायचे आणि व्हिडिओ रेकॉर्ड केले जायचे. ज्या व्यक्तीने ही खोली उपलब्ध करून दिली होती, त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून 5 मोबाईल फोन आणि एक लॅपटॉप जप्त करण्यात आला असून त्याचा तपास सुरू आहे. पोलीस आता डिलीट केलेले व्हिडिओ रिकव्हर करण्याचा आणि या नेटवर्कमधील इतर लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.