जळगाव: जंगलात आढळला अर्धवट जळालेल्या अवस्थेतील महिलेचा मृतदेह... परिसरात खळबळ

मुंबई तक

05 Feb 2026 (अपडेटेड: 05 Feb 2026, 01:45 PM)

जळगाव जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. येथील एरंडोल तहसीलमध्ये पद्मालय शिवाराच्या जंगलात एका अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला.

अर्धवट जळालेल्या अवस्थेतील महिलेचा मृतदेह...

अर्धवट जळालेल्या अवस्थेतील महिलेचा मृतदेह...

Google CTA

बातम्या हायलाइट

point

जंगलात आढळला अर्धवट जळालेल्या अवस्थेतील महिलेचा मृतदेह...

point

जळगावमध्ये खळबळ

जळगाव: जळगाव जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. येथील एरंडोल तहसीलमध्ये पद्मालय शिवाराच्या जंगलात एका अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भयानक अवस्थेतील मृतदेह सापडल्यामुळे महिलेची हत्या करण्यात आल्याचा आता संशय व्यक्त केला जात आहे. 

हे वाचलं का?

घटनास्थळी पोलिसांचा तपास   

पद्मालय शिवाराच्या जंगलात महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्यानंतर तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. संबंधित घटनेची माहिती मिळताच, एरंडोल पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर, पंचनामा करून पोलिसांनी अज्ञात महिलेचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. तसेच, पुढील तपासासाठी मृतदेह ऑटोप्सीसाठी पाठवण्यात आला. मृतदेहाची ओळख अद्याप पटली नसून पोलीस मृत महिलेचं वय, ओळख आणि मृत्यूमागचं नेमकं कारण जाणून घेण्यासाठी तपास करत आहेत. 

हे ही वाचा: Govt Job: भारताच्या तपास यंत्रणेत मिळवा नोकरी! मोठ्या पदांसाठी भरती जाहीर... जाणून घ्या, पात्रता

प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास 

संबंधित प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला जात असल्याचं सांगितलं जात आहे. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन एक फॉरेन्सिक टीम आणि एक डॉग स्क्वायड सुद्धा घटनास्थळी बोलवण्यात आलं. पोलीस सध्या त्या जंगलाच्या परिसराचा देखील तपास करत असल्याची माहिती आहे.