बीड : 'अरे पळू नको..', नटून-थटून आलेला नवरदेव भर मंडपातून पळून गेला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Beed Crime News : बीडजवळील कपिलधार येथील एका मंगल कार्यालयात हा विवाह सोहळा सुरू होता. वधू ही अल्पवयीन असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने सामाजिक कार्यकर्त्यांसह संबंधित ठिकाणी छापा टाकला. तोपर्यंत विवाहाचे विधी पार पडले होते. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच नवरदेवाने कुठलीही प्रतिक्रिया न देता थेट मंडपातून पळ काढला आणि थेट फरार झाला.

Beed Crime News

Beed Crime News

मुंबई तक

06 Feb 2026 (अपडेटेड: 06 Feb 2026, 10:58 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

बीड : 'अरे पळू नको..', भर मंडपातून नवरदेव पळून गेला; नेमकं काय घडलं?

point

बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये संबंधितांवर कारवाई

Beed Crime News : बीड जिल्ह्यातील कपिलधार येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलीचा विवाह लावला जात असल्याची माहिती मिळताच पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मंगल कार्यालयात धडक दिली. मात्र, पोलिसांना पाहताच नवरदेवाने थेट भर मंडपातून पलायन केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, ‘अरे पळू नको, गुन्हे दाखल होती…’ असं या व्हिडीओमध्ये म्हटलं जात आहे.

हे वाचलं का?

बीडजवळील कपिलधार येथील एका मंगल कार्यालयात हा विवाह सोहळा सुरू होता. वधू ही अल्पवयीन असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने सामाजिक कार्यकर्त्यांसह संबंधित ठिकाणी छापा टाकला. तोपर्यंत विवाहाचे विधी पार पडले होते. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच नवरदेवाने कुठलीही प्रतिक्रिया न देता थेट मंडपातून पळ काढला आणि थेट फरार झाला.

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आल्याने प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. बालविवाह रोखण्यासाठी सातत्याने जनजागृती आणि कारवाई होत असतानाही अशा प्रकारांची पुनरावृत्ती होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून वधू-वराचे आई-वडील, जवळचे नातेवाईक, वराडी मंडळी तसेच कपिलधार देवस्थानच्या विश्वस्तांसह सुमारे 100 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये संबंधितांवर कारवाई करण्यात आली असून, विवाह घडवून आणण्यासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांनाही आरोपी करण्यात आले आहे. सध्या पलायन केलेल्या नवरदेवाचा शोध सुरू असून, त्याला लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, बीड जिल्ह्यात अल्पवयीन मुलींच्या लग्नाचे असे प्रकार अनेकदा समोर आले आहे. हे प्रकार रोखण्यासाठी पोलीस प्रशासनासह सामाजिक कार्यकर्ते सतत प्रयत्न करत आहेत. मात्र, समाजातील काही घटकांकडून कायद्याकडे दुर्लक्ष करून अशा घटना घडत असल्याने कठोर अंमलबजावणीची गरज अधोरेखित होत आहे. या घटनेनंतर प्रशासनाने पुन्हा एकदा इशारा दिला असून, बालविवाहासारख्या गुन्ह्यांमध्ये सहभागी आढळल्यास कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. आता या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, व्हायरल व्हिडिओही पुरावा म्हणून तपासात समाविष्ट करण्यात आला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

आई वडिलांनी मुलाला जेवण आणण्यासाठी घराबाहेर पाठवले, नंतर घरात गळफास घेत दोघांनीही जीवन संपवलं

    follow whatsapp