Maharashtra Rain alert : अतिवृष्टी! मुंबई-पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

मुंबई तक

19 Jul 2023 (अपडेटेड: 19 Jul 2023, 03:18 AM)

भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, सातारा, कोकण, नाशिक, विदर्भ, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

IMD issued red mumbai, pune, satara, konkan region and vidarbha

IMD issued red mumbai, pune, satara, konkan region and vidarbha

follow google news

Maharashtra weather forecast : बंगालच्या उपसागरात चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने महाराष्ट्रासह मध्य भारतातील काही राज्यांत अतिवृष्टी सदृश्य पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, हवामान विभागाने मुंबई-पुण्यासह राज्यातील काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. (maharashtra rain news today : Red Alert issued by indian meteorological department for some district of maharashtra)

हे वाचलं का?

मान्सून सक्रीय झाला असून, दुसरीकडे 19 जुलैला बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाल्याने देशाती अनेक भागात पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाच्या माहितीप्रमाणे कोकण, विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अतिवृष्टीसदृश्य पावसाचा अंदाज आहे.

Weather updates : 19 जुलै

पालघर, रायगड, पुणे, सातारा या चार जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, नाशिक, रत्नागिरी, कोल्हापूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

वाचा >> Kirit Somaiya : ‘महिलांना फोन करून…’, सोमय्यांच्या व्हिडीओवर अनिल परबांनी काय सांगितलं?

20 जुलैला कोणत्या जिल्ह्यात बरसणार मुसळधार?

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे 20 जुलैलाही मुंबई-पुण्यासह काही जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे.

वाचा >> शिवसेनेच्या फुटीवर नरेंद्र मोदी पहिल्यांदाच बोलले; म्हणाले, “बाळासाहेब ठाकरेंचे…”

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज असून या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

वाचा >> NDA vs INDIA : कुणाची किती ताकद? कुंपणावरचे पक्ष ठरणार किंगमेकर?

21 पुण्यासह कोकणात जोर राहणार कायम

महाराष्ट्रात 21 जुलैलाही काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर विदर्भातील सर्व जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

    follow whatsapp