NDA vs INDIA : कुणाची किती ताकद? कुंपणावरचे पक्ष ठरणार किंगमेकर?

मुंबई तक

ADVERTISEMENT

The alliance was named India in a meeting of 26 opposition parties held in Bengaluru. Its full form is 'Indian National Democratic Inclusive Alliance'.
The alliance was named India in a meeting of 26 opposition parties held in Bengaluru. Its full form is 'Indian National Democratic Inclusive Alliance'.
social share
google news

NDA vs INDIA Alliance : पाटण्यानंतर बंगळुरू येथे झालेल्या 26 विरोधी पक्षांच्या बैठकीत राष्ट्रीय पातळीवरील नव्या आघाडीला इंडिया (indian national developmental inclusion alliance) असे नाव देण्यात आले. त्याचवेळी, दुसरीकडे भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएची बैठकही बंगळुरूपासून दोन हजार किलोमीटर अंतरावर दिल्लीत झाली. या बैठकीत 38 पक्ष सहभागी झाल्याचा दावा करण्यात आला. (There are 26 parties in ‘INDIA’ and 38 parties in NDA… Know who has Powerfull?)

आता भाजपने विरोधकांवर तर काँग्रेसने एनडीएच्या बैठकीवर प्रश्न उपस्थित केले. भाजप कर्नाटकने एका ट्विटमध्ये या बैठकीला ‘संधीसाधू’ म्हटले आहे. तर ‘भूत’ बनलेल्या एनडीएला पुन्हा जिवंत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

आता असा प्रश्न उपस्थित होतोय की, विरोधकांची एकजूट काही प्रभावी ठरणार आहे का? दुसरीकडे एनडीए, ज्यामध्ये अलीकडे अनेक नवीन पक्ष सामील झाले आहेत, 2019 पेक्षाही मोठा विजय मिळवू शकेल का? आता हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की, विरोधी पक्ष आणि एनडीएच्या बैठकीत कोण-कोण आले होते?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

राजकीय समीकरणं कशी बदलली?

विरोधकांच्या बैठकीत 26 पक्ष सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली 23 जून रोजी पाटणा येथे झालेल्या बैठकीत 15 पक्ष सहभागी झाले होते. हे सर्व 15 पक्ष यावेळीही उपस्थित आहेत.

काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी, सीपीआय, सीपीआय एम, राजद, झारखंड मुक्ती मोर्चा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), समाजवादी पार्टी आणि जेडीयू या व्यतिरिक्त द्रमुक, के द्रमुक, व्हीसीके, आरएसपी, CPI-ML, फॉरवर्ड ब्लॉक, IUML, केरळ काँग्रेस (जोसेफ) आणि केरळ काँग्रेस (मणी), अपना दल (कामेरवाडी) आणि मनिथनेय मक्कल काची (एमएमके).

ADVERTISEMENT

वाचा >> Kirit Somaiya : ‘महिलांना फोन करून…’, सोमय्यांच्या व्हिडीओवर अनिल परबांनी काय सांगितलं?

इकडे, काही नवीन पक्ष एनडीएमध्ये सामील झाले आहेत. चिराग पासवान सोमवारीच एनडीएमध्ये सामील झाले आहेत. ओमप्रकाश राजभर यांचा सुहेलदेव भारतीय समाज पक्ष आणि जीतन राम मांझी यांचा हिंदुस्थानी अवाम मोर्चा (धर्मनिरपेक्ष) देखील एनडीएचा भाग बनले आहेत.

ADVERTISEMENT

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी एनडीएच्या बैठकीत 38 पक्षांची उपस्थिती असल्याचा दावा केला. या बैठकीत एकनाथ शिंदे गटाची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, उपेंद्र कुशवाह यांचा राष्ट्रीय लोक जनता दल आणि पवन कल्याण यांची जनसेनाही या बैठकीत आहे.

कोणता पक्ष कोणत्या आघाडीत?

INDIA : काँग्रेस, डीएमके, टीएमसी, जेडीयू, शिवसेना (यूबीटी), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), सीपीआयएम, समाजवादी पार्टी, इंडियन युनियन मुस्लिम लीग, सीपीआय, आम आदमी पार्टी, झारखंड मुक्ती मोर्चा, केरळ काँग्रेस (एम), आरजेडी , नॅशनल कॉन्फरन्स, PDP, CPI (ML), RLD, Manithaneya Makkal Kachi (MMK), MDMK, VCK, RSP, केरळ काँग्रेस, KMDK, अपना दल (कमेरावाडी) आणि AIFB.

NDA : भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट), राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्ष (पारस), लोक जनशक्ती पक्ष (रामविलास पासवान), अपना दल (सोनेलाल), AIADMK, NPP, NDPP, SKM, IMKMK, AJSU, MNF, NPF, RPI, JJP, IPFT (त्रिपुरा), BPP, PMK, MGP, AGP, निषाद पार्टी, UPPL, AIRNC, TMC (तमिळ मनिला कॉंग्रेस), शिरोमणी अकाली दल युनायटेड, जनसेना, NCP (अजित पवार), HAM , RLSP, Subhaspa, BDJS (केरळ), केरळ काँग्रेस (थॉमस), गोरखा नॅशनल लिबरेशन फ्रंट, जनतापथ्य राष्ट्रीय सभा, UDP, HSDP, जन सूरज पार्टी (महाराष्ट्र) आणि प्रहार जनशक्ती पार्टी (महाराष्ट्र).

कोणाची किती ताकद?

भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचे लोकसभेत 350 हून अधिक खासदार आहेत. तर, विरोधकांच्या बैठकीत सहभागी झालेल्या सर्व पक्षांचे जेमतेम दीडशे खासदार आहेत.

मात्र, आकडेवारी पाहिल्यास विरोधी पक्षांच्या बैठकीला उपस्थित राहिलेल्या 50 टक्क्यांहून अधिक पक्षांचा लोकसभेत एकही खासदार नाही. तर एनडीएच्या बैठकीत सहभागी झालेल्या 65 टक्के पक्षांना लोकसभेची एकही जागा जिंकता आलेली नाही.

वाचा >> Kirit Somaiya : नीलम गोऱ्हेंसमोरच काढला व्हिडीओंचा पेन ड्राईव्ह, अंबादास दानवे म्हणाले…

दुसरीकडे प्रादेशिक आणि विशिष्ट जातीवर चांगलेच वर्चस्व असलेल्या एनडीएच्या बैठकीत असे अनेक पक्ष असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. यूपी आणि बिहारसारख्या राज्यांमध्ये हे पक्ष महत्त्वाचे घटक ठरू शकतात. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 आणि बिहारमध्ये 40 जागा आहेत. म्हणजेच लोकसभेच्या 22 टक्के जागा या दोन राज्यांत आहेत.

त्याचवेळी विरोधी पक्षांची एकजूट भारतीय राजकारणासाठी ‘गेम चेंजर’ ठरेल, असा दावा काँग्रेसने केला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणतात की, गेल्या काही दिवसांपासून अचानक एनडीएबद्दल ऐकू येत आहे. जी एनडीए ‘भूत’ बनली होती ती आता पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न करत आहे.

तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी दावा केला की, एनडीएमध्ये सहभागी असलेल्या आठ पक्षांकडे एकही खासदार नाही. नऊ पक्षांकडे प्रत्येकी एकच खासदार आहे, तर तीन पक्षांकडे प्रत्येकी दोनच खासदार आहेत.

तटस्थ राहणारे ठरणार किंगमेकर?

ओडिशातील बिजू जनता दल, आंध्र प्रदेशातील वायएसआर काँग्रेस, कर्नाटकतील जनता दल (धर्मनिरपेक्ष), उत्तर प्रदेशातील बसपा, पंजाबमधील अकाली दल, तेलंगणातील तेलुगू देसम पक्ष आणि बीआरएस या पक्षांनी अजूनही आपले पत्ते उघडलेले नाहीत.

हे असे पक्ष आहेत जे ना विरोधकांच्या महाआघाडीचा भाग बनले आहेत, ना भाजपच्या नेतृत्वाखालील NDA सोबत आले आहेत.

आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बीआरएस वगळता इतर सर्व पक्षांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या मुद्द्यावर भाजपला पाठिंबा दिलेला आहे. या पक्षांचे लोकसभेत सुमारे पन्नास खासदार आहेत.

निवडणुकीनंतर हे पक्ष आपले पत्ते उघडू शकतात, असे मानले जात आहे. अशा परिस्थितीत त्यांची भूमिका किंगमेकरची असू शकते. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची लढाई सुरू झाली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील ‘एनडीए’चा मुकाबला विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीसोबत असणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT