Maharashtra Lok Sabha : अजित पवारांना धक्के, फडणवीसांनी विधानसभेसाठी टाकला डाव?
Maharashtra Politics : महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक सुरू असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी दोन विधानसभा मतदारसंघात उमेदवारांची घोषणा केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू

फडणवीसांनी दोन उमेदवारांच्या नावाची केली घोषणा

अजित पवारांच्या इच्छुकांचं काय होणार?
Mahayuti Maharashtra Lok Sabha election : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरुन महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये संघर्ष झाल्याचे दिसले. युती आणि आघाडी दोन्हीकडे तीन-तीन प्रमुख पक्षांमध्ये जागांसाठी बरीच रस्सीखेच झाली. पण, आता लोकसभा निवडणूक संपण्याआधीच विधानसभेसाठी प्रत्येक पक्षाकडून फिल्ड़िंग लावणे सुरु झाले आहे. (Devendra Fadnavis announced the names of two candidates for the assembly elections)
लोकसभेला ४८ जागांचं वाटप करतानाच महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांच्या नाकीनऊ आले. विधानसभेला तर २८८ जागांचा विषय असणार आहे. त्यामुळे हे किती मोठी डोकेदुखी असणार आहे, याची कल्पना यायला लागली आहे. लोकसभेच्या प्रचारसभांमध्येच याची प्रचिती यायला लागली आहे. काही प्रमुख पक्षांनी आपले उमेदवारच जाहीर करायला सुरुवात केलीये. त्यामुळे आतापासूनच काही विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये संघर्ष सुरु होणार, अशी शक्यता दिसत आहे.
हेही वाचा >> "आमची चूक झाली", उद्धव ठाकरेंबद्दल बोलताना फडणवीसांचं मोठं विधान
महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अनेक ठिकाणी धूसफूस असल्याचं चित्र अजूनही दिसून येतंय. बड्या नेत्यांकडून जरी एकीनं काम करण्याची भाषा माध्यमांसमोर वापरली जात असली, तरी स्थानिक लेव्हलला बऱ्याच ठिकाणी संघर्ष सुरु असल्याचं दिसून आलंय.
आता लोकसभेचा हा गोंधळ सुरु असतानाच विधानसभा मतदारसंघातही संघर्षाची चिन्हं दिसायला लागली आहेत. दोन जागांवर ठिणगी देखील पडलीय असं आपण म्हणू शकतो.