धाराशिव जिल्हा परिषदेत भाजपने रचला इतिहास, अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय
Dharashiv ZP : धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या निवडणुकीत महायुतीने स्पष्ट बहुमतासह विजय मिळवला आहे. अध्यक्षपदी भाजपच्या अर्चना पाटील यांची तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या (शिंदे गट) उषा गायकवाड यांची निवड बहुमताने निवड झाली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
धाराशिव जिल्हा परिषदेत भाजपने रचला इतिहास
अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय
Dharashiv ZP, गणेश जाधव : धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या निवडणुकीत महायुतीने स्पष्ट बहुमतासह विजय मिळवला आहे. अध्यक्षपदी भाजपच्या अर्चना पाटील यांची तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या (शिंदे गट) उषा गायकवाड यांची निवड बहुमताने निवड झाली आहे. विशेष म्हणजे 1962 नंतर जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच भाजपचा उमेदवार अध्यक्षपदी निवडून आला असल्याने या निकालाला राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
दोन्ही पदांवर महायुतीचे वर्चस्व
अध्यक्षपदासाठी भाजपच्या अर्चना राणाजगजीतसिंह पाटील यांनी 45 मते मिळवत विजय मिळवला, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी ठाकरे गटाच्या कांचनमाला संगवे यांना 9 मते मिळाली. तसेच काँग्रेसचा एक सदस्य अनुपस्थित राहिल्याची नोंद झाली. उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या उषा रवींद्र गायकवाड यांनीही 45 मते मिळवत बाजी मारली. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे महेश देशमुख यांना 10 मते मिळाली. जिल्हा परिषदेत एकूण 55 सदस्य असताना महायुतीने मोठ्या मताधिक्याने दोन्ही पदांवर वर्चस्व सिद्ध केले.
महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत
अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत रंगली. अध्यक्षपदासाठी भाजपकडून तेर गटाच्या सदस्या अर्चना पाटील, तर महाविकास आघाडीकडून शिराढोण गटातील कांचनमाला संगवे रिंगणात होत्या. उपाध्यक्षपदासाठी कडेर गटातील सदस्य उषा गायकवाड आणि कवठा गटातील काँग्रेसचे महेश देशमुख यांच्यात सामना झाला.










