फुटपाथवर झोपलेल्या मजुराची हातोड्याने वार करुन हत्या, किराणा दुकानाबाहेर काय घडलं?
हैदराबादमधील एका फुटपाथवर झोपलेल्या मजुराची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हातोड्याने वार करुन या मजुराला संपवण्यात आलं. नेमकी घटना काय आहे, जाणून घ्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मजुराची निर्घृण हत्या
हातोड्याने वार करुन संपवलं
नेमकं काय घडलं?
Crime News : एका 40 वर्षीय व्यक्तीची डोक्यात हातोड्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुभाष असे मृत व्यक्तीचे नाव असून, ते मजुरीचे काम करत होते आणि फुटपाथवरच झोपत असत. बुधवारच्या (14 ऑक्टोबर) रात्री ते एका किराणा स्टोअरच्या बाहेर झोपलेले असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यावर गंभीर वार केले, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
नेमकं काय घडलं?
हैदराबादमधील अशोक नगर परिसरातील ही घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष हे मजुरीचे काम करतात. कामावरुन आल्यानंतर ते फुटपाथवरच झोपतात. ज्यादिवशी हत्या झाली त्या दिवशी ते एका किराणा दुकानाबाहेर झोपले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र एका गरीब मजुराची कुणी व कशासाठी हत्या केली असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हे ही वाचा : CJP च्या पत्रकार परिषदेत गोंधळ अन् घोषणाबाजी, नेहा बोरा बोलत असताना काय घडलं? दिपकेंनी चांगलंच सुनावलं!
रक्ताने माखलेला हातोडा
गुरुवारी सकाळी परिसरातील नागरिकांना सुभाष रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसल्याने त्यांनी तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन चिक्कडपल्ली पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया व शवविच्छेदनासाठी गांधी रुग्णालयात पाठवला. तपासादरम्यान पोलिसांना घटनास्थळाजवळच रक्ताने माखलेला एक हातोडा सापडला असून, हा या प्रकरणाचा मुख्य पुरावा मानला जात आहे.
हे ही वाचा : राहुल गांधींच्या आंदोलनावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे, आंदोलनातील वर्तनावर कोर्टाचे गंभीर सवाल!
हत्येचं कारण काय?
या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103 (1) अन्वये हत्येचा गुन्हा नोंदवला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. प्राथमिक तपासात हत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसले, तरी जुन्या वैमनस्यातून किंवा पूर्वकोपावरून हा हल्ला झाला असावा, अशी दाट शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. हल्लेखोर कोण होते आणि त्यांनी हे निर्घृण कृत्य का केले, या सर्व बाजूंचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
