Shiv Sena : "एकनाथ शिंदे तुरुंगात जाणार", तडीपारीच्या कारवाईवरुन संजय राऊत भडकले

मुंबई तक

ADVERTISEMENT

संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे यांना इशारा
संजय राऊत आणि एकनाथ शिंदे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

संजय राऊत यांची एकनाथ शिंदेंवर टीका

point

सुधारकर बडगुजर यांना तडीपारची नोटीस

point

नाशिकमध्ये ठाकरेंच्या नेत्यावर कारवाई

Sanjay Raut Eknath Shinde : 'ज्या गुन्ह्यामुळे एकनाथ शिंदे ईडीला घाबरून पळून गेले, त्याच प्रकरणात ते तुरुंगात जातील. मोदी, शाह, फडणवीस वाचवायला येणार नाहीत. त्यांनी आणि त्यांच्या टोळीने ४ जूननंतर तुरुंगात जायची तयारी ठेवावी', असा इशारा खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना दिला. सुधाकर बडगुजर यांना तडीपारची नोटीस बजावल्यानंतर राऊत संतापले. (Sanjay Raut said that Eknath Shinde will be behind bars after 4 June)

ADVERTISEMENT

संजय राऊत यांनी अहमदनगरमध्ये माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंना लक्ष्य केले.

अटक होईल या भीतीने त्यांची गाळण उडाली  -राऊत

एकनाथ शिंदे यांनी खिचडी घोटाळ्यावरून केलेल्या टीकेला उत्तर देताना राऊत म्हणाले, "चार जूनपर्यंत तुम्हाला जे काही तांडव करायचं, ते करा. मग तुमचे जे काय घोटाळे आहेत, ते बाहेर काढू. बाहेर निघतच आहेत. एकनाथ शिंदेंनी भ्रष्टाचारावर बोलावं, हे फार मोठं आश्चर्य आहे. स्वतः केलेल्या भ्रष्टाचाराला घाबरून ज्या माणसाने पलायन केले. स्वतःचे घोटाळे बाहेर पडताहेत आणि मला अटक होईल, या भीतीने ज्याची गाळण उडाली. पाय लटपटू लागले. डोळ्यातून अश्रू काढले, असा माणूस भ्रष्टाचारावर बोलतो. ही महाराष्ट्रातील फार मोठी गंमत आहे."

हे वाचलं का?

हेही वाचा >> उद्धव ठाकरे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील? अजित पवार म्हणाले... 

नाशिकचे सुधारकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. या कारवाईवर राऊत म्हणाले की, "ऐन निवडणुकी आमचा प्रमुख नेता, आमचा जिल्हाप्रमुख हा जो प्रचारात आघाडीवर आहे. ज्याच्या हातात निवडणुकीची सूत्रे आहेत. त्यांना तुम्ही तडीपारीची नोटीस काढता. त्याला तुम्ही काय म्हणणार? सगळे गुंड, तडीपार तुरुंगातून सोडून तुम्ही (एकनाथ शिंदे) आपल्यासोबत घेतले आहेत, याला तुम्ही काय म्हणणार?"

हेही वाचा >> 'बाळासाहेब ठाकरेंच्या नकली शिवसेनेची संतान..', आंध्रप्रदेशातून मोदींची ठाकरेंवर जहरी टीका

"राजकीय कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस टाकून तुम्ही तडीपाऱ्या करत आहात. चार जूननंतर उत्तर दिले जाईल. या राज्याचा मुख्यमंत्री तडीपार होईल, असे त्यांचे गुन्हे आहेत. मुख्यमंत्री आणि त्यांची टोळी यांचे एवढे अपराध आहेत की, या एकनाथ शिंदेंना तडीपारीची नोटीस बजावली जाईल. एकतर ते तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील. लिहून ठेवा. मी हे नगरमध्ये सांगतोय", असा इशारा राऊत यांनी दिला.

 

ADVERTISEMENT

"ज्या गुन्ह्यासाठी लटपटून ते पळून गेले ईडीला. तिच ईडी त्यांच्या मागे लागेल आणि ते तुरुंगात जातील. त्यांना कुणी वाचवणार नाही. त्यांना वाचवायला मोदी येणार नाहीत, की, अमित शाह येणार नाही. फडणवीस येणार नाहीत. त्यांनी तयारी ठेवावी तुरुंगात जायची. त्यांनी आणि त्यांच्या लोकांनी", असा गर्भित इशारा राऊत यांनी शिंदेंना दिला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT