लाइव्ह

Maharashtra Lok Sabha Election Live : 'काँग्रेसमध्ये विलिनीकरण' : उद्धव ठाकरे, शरद पवार सांगतील तेच करतील -फडणवीस

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Maharashtra Lok Sabha Election 2024 Live News : लोकसभा निवडणुकीमुळे महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. प्रचाराने वेग घेतला असून प्रचारातील मुद्देही बदलले आहेत. 

ADVERTISEMENT

पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात वेगळे मुद्दे प्रचारात होते, पण तिसऱ्या टप्प्यापासून प्रचारातील टीकेचा सूर बदलला असून, धार्मिक धुव्रीकरण आणि संविधानात बदल या दोन मुद्द्यांभोवती प्रचार होताना दिसत आहे. 

भाजप प्रणित एनडीए आघाडीची प्रचारातील भाषा बदलली असून, इंडिया आघाडीकडून संविधान बदलाच्या मुद्द्यावरून कोंडी केली जात आहे. त्यामुळे राजकीय रण पेटले असून, चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात मतदान असलेल्या लोकसभा मतदारसंघात वेगाने राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. 

लोकसभा निवडणूक २०२४ आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घटनांची माहिती जाणून घेण्यासाठी वाचत रहा लाईव्ह अपडेट्स...

 

ADVERTISEMENT

  • 02:57 PM • 09 May 2024

    Sharad Pawar :  24 जागांवरील मतदानानंतर पवारांची निकालाबद्दल भविष्यवाणी

    साताऱ्यात बोलताना शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल भविष्यवाणी केली.  

    साताऱ्यात माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, "जी माहिती मिळतेय ती अतिशय अनुकूल आहे. म्हणजे या सगळ्याच मतदारसंघांमध्ये चांगलं यश मिळेल. मागच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला एक जागा मिळाली. आम्हाला चार जागा मिळाल्या होत्या. एक एमआयएमला मिळाली. म्हणजे एकूण सहा जागा २०१९ साली विरोधकांना मिळाल्या होत्या. आता चित्र असे दिसत आहे की, महाविकास आघाडीची संख्या ३० ते ३५ पर्यंत जाण्याची शक्यता आहे. लोकांना बदल हवा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला लोकांचे समर्थन मिळत असल्याचा ट्रेंड मला दिसत आहे."

  • 01:50 PM • 09 May 2024

    Shirur Lok Sabha Updates : "मी शरद पवारांचा मुलगा असतो, तर...", अजित पवारांनी व्यक्त केली खंत

    जुन्नरमधील केंदूर येथील प्रचारसभेत बोलताना अजित पवारांनी खंत व्यक्त केली. 

    "मी ३०-३२ वर्षात कधीही शब्द मोडला नाही. पण, मी पण आता साठीच्या पुढे गेलो. किती दिवस? आम्हाला काही चान्स आहे की नाही. आम्ही काही चुकीचं वागतो का? भावनिक होऊ नका. नवीन लोकांना संधी द्यायला पाहिजे."

    "केंदूरकरांनो, मी जर साहेबांचा (शरद पवार) मुलगा असतो, तर मला संधी मिळाली असती की नाही? मिळालीच असती. फक्त मी त्यांचा मुलगा नाही म्हणून संधी नाही. हा कसला न्याय? आम्ही दिवसरात्र काम केलं. पूर्ण जिल्हा सांभाळला. साहेबांकडे जिल्हा बँक नव्हती. जिल्हा बँक इतरांच्या हातात असायची. मी राजकारणात आल्यापासून... १९९१ पासून आजपर्यंत ताब्यात ठेवली आहे." 

    सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा

  • 01:30 PM • 09 May 2024

    Shiv Sena UBT : ठाकरे अनिल परबांना 'या' मतदारसंघातून उतरवणार मैदानात?

    विधान परिषदेसाठीच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर आणि मुंबई व नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आता ठाकरेंच्या शिवसेनेत उमेदवारीची चर्चा सुरू झाली आहे.

    मुंबई पदवीधर आणि शिक्षक त्यासोबतच कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या चार जागांच्या  निवडणुका 10 जूनला होणार आहेत. तर 22 मे रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची तारीख असणार आहे. 

    या निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेने शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी आधीपासूनच तयारी सुरू केली आहे. 

    मुंबई पदवीधर मतदारसंघांमध्ये विलास पोतनीस हे आमदार म्हणून कार्यरत आहेत. मात्र, आता त्यांच्या ऐवजी विधान परिषदेचे आमदार अनिल परब यांना मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवार म्हणून उतरवले जाऊ शकते.

    अनिल परब यांचा 27 जुलै रोजी विधान परिषदेच्या आमदारकीचा कार्यकाळ पूर्ण होत आहे आणि त्यामुळेच मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी अनिल परब यांचं नाव उमेदवारीसाठी अधिक चर्चेत आहे.

    त्यासोबतच शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवा सेना नेते सचिव वरून सरदेसाई यांचा सुद्धा विचार मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी केला जात आहे.

    मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांचं नाव उमेदवारीसाठी जवळपास निश्चित मानलं जात आहे.

    कोकण पदवीधर मतदारसंघातून रायगडचे सह संपर्कप्रमुख आणि अनंत गीते यांचे विश्वासू किशोर जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    नाशिक शिक्षक मतदारसंघात सध्या आमदार असलेले किशोर दराडे हे जरी ठाकरेंसोबत असले, तरी दुसऱ्या नावाची चाचपणी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

  • 11:39 AM • 09 May 2024

    'काँग्रेसमध्ये विलिनीकरण' : "उद्धव ठाकरे, शरद पवार सांगतील तेच करतील"

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार का, या चर्चेवर बोलताना मोठं विधान केले आहे. 

    उद्धव ठाकरे आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील, असं मला वाटत नाही, असे अजित पवार म्हणाले. यालाच धरून फडणवीस म्हणाले की, "अजित पवार उद्धवजींना किती ओळखतात मला माहिती नाही. पण, मी उद्धवजींना चांगला ओळखून आहे. सध्या उद्धवजींचे फिलॉसॉफर आणि गाईड हे पवार साहेब आहेत. पवार साहेब जे म्हणतील, तेच उद्धवजी करतील", असे मत फडणवीस यांनी मांडले.

    मी शरद पवारांचा मुलगा असतो, तर मला संधी मिळाली असती, असे अजित पवार म्हणाले. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "ते तर स्पष्टच आहे. त्यांनी जे सांगितलंय त्यात काही आश्चर्य आहे का? शेवटी पवारसाहेबांसोबत पक्ष कुणी उभा केला, तो अजित पवारांनी केला. पण, शेवटी त्यांना बाहेर का निघावं लागलं, कारण शेवटी त्यांच्या लक्षात आलं की, आपल्याला पक्ष मिळणार नाही. पक्षामध्ये आपल्याला स्थान मिळणार नाही. स्थान पवार साहेब सुप्रिया ताईंनाच देतील. त्यामुळेच ते बाहेर पडले."

  • ADVERTISEMENT

  • 08:35 AM • 09 May 2024

    Maharashtra News Live : काँग्रेसमध्ये शिवसेना (UBT) विलीन होणार? अजित पवारांनी काय दिले उत्तर?

    पुण्यात माध्यमांशी अजित पवारांनी संवाद साधला. यावेळी त्यांना शरद पवारांच्या विधानाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, असे पवार म्हणाले होते. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचा विषयही चर्चेत आला. त्याला उत्तर देताना अजित पवार काय म्हणाले वाचा...

    "मला जे वाटलं, ते मी केलं. आता माझी भूमिका ही आहे. त्यांनी काय भूमिका घ्यावी आणि काय बोलावं... कधी कधी एक संभ्रमावस्था निर्माण करण्यासाठीही अशा प्रकारची विधाने येतात. त्यांचं विधान आल्यानंतर... आता उद्धवजींचाही त्यांनी उल्लेख केला. मला नाही वाटत उद्धवजी त्यांचा पक्ष कधी काँग्रेसमध्ये विलीन करतील. मी जे उद्धवजींना गेले अडीच वर्ष जवळून पाहिलं आहे, उपमुख्यमंत्री म्हणून. ते मुख्यमंत्री होते. मला त्यांच्यासोबत काम करायची संधी मिळायची. मी त्यांना जे अनुभवलंय. मी त्यांचा स्वभाव जो पारखलाय किंवा त्यांची कामाची पद्धत वगैरे... ते बघता उद्धवजी असा काही निर्णय घेतील, पक्ष विलीन करण्याचा असं मला अजिबात वाटत नाही." 

follow whatsapp

ADVERTISEMENT