Ajit Pawar : "मी शरद पवारांना सोडतच नव्हतो", अजित पवारांचा खळबळजनक खुलासा

मुंबई तक

Ajit pawar Sharad pawar : अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडण्याबद्दल पुन्हा एकदा भाष्य केले आहे. काही गोष्टी अजित पवारांनी प्रामुख्याने सांगितल्या आहेत.

ADVERTISEMENT

अजित पवार आणि शरद पवार.
अजित पवार यांचे शरद पवारांबद्दल मोठे विधान
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अजित पवाराचं पुन्हा एकदा भाष्य

point

३०-३२ वर्ष शरद पवारांचंच ऐकलं

Ajit Pawar on Sharad Pawar : बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदान पार पडल्यानंतर अजित पवारांकडून केल्या जाणाऱ्या विधानांनी अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शरद पवारांना सातत्याने लक्ष्य करत असलेल्या अजित पवारांनी दोन दिवसांत वेगवेगळी विधाने केली असून, शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत अजित पवारांनी एक मोठं विधान केलं आहे. त्यामुळे अजित पवारांचे सूर नरमले का? अजित पवारांची भाषा बदललीये का? अशी चर्चा जोरात सुरू झाली आहे. ()

जुन्नर तालुक्यातील केंदूर येथे झालेल्या सभेत अजित पवार शरद पवारांबद्दल काय बोलले ते वाचा

"मी काही निर्णय घेतले. मधल्या काळात आम्ही सगळ्यांनी पवार साहेबांना विनंती केली. तुम्ही ८० वर्षाच्या पुढे गेला आहात. ८४ वर्षे झालेत. आम्ही चांगले काम करू. दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ यांच्यासह आम्ही अनेक वर्ष राज्य चालवले आहे. तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. साहेबांनी मला सांगितलं की, "ठीक आहे अजित. मी आता राजीनामा देतो. मलाही आता सगळं कुणावर तरी सोपवायचं आहे. तुम्ही सगळे हे चालवा.मी म्हणालो की, साहेब हा तुमचा निर्णय आहे."

हेही वाचा >> महाराष्ट्रातील दहा खासदारांना तिकीटं न देण्याची 'ही' आहेत

"मित्रानों, मला काहींनी सांगितलं. तुमचं साहेबांवर प्रेम आहे. तुम्हाला असं वाटतं की, दादांनी (अजित पवार) या वयात पवार साहेबांना सोडायला नको होतं. मी सोडतच नव्हतो. मी म्हणत होतो की, तुम्ही घरी बसा. तुम्ही तब्येतीला सांभाळा. आम्हाला मार्गदर्शन करा. कुठं चुकलं तर कानाला धरा."

"साहेब म्हणाले घ्यायचं नाही"

"कुठं काही सूचवायचं असेल, तर सूचवा. जसं मी ३०-३२ वर्षे तुमचं ऐकत आलोय. तुम्ही म्हणाल ते करत आलोय. २००४ ला मुख्यमंत्रीपद आपल्याला मिळत होतं. तरी साहेब म्हणाले घ्यायचं नाही. साहेबांनी सांगितलं आता भाजपसोबत जायचं. जायचं. आता शिवसेनेबरोबर जायचं. जायचं. आता काँग्रेसला सोडायचं, सोडलं. सोनिया गांधी परकीय व्यक्ती आहे असा मुद्दा काढला. हे सगळं तुमच्यासमोर आहे."

हे वाचलं का?

    follow whatsapp