Chandrashekhar Bawankule: "उद्धव ठाकरे, हिंमत असेल तर पाच प्रश्नांची उत्तरं द्या", भाजपने मुलाखतीची उडवली खिल्ली
Uddhav Thackeray Interview : उद्धव ठाकरेंनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत विविध मुद्यांवरून भाजपवर निशाणा साधला. याच्या प्रत्युत्तरात 'हिंमत असेल तर एक मुलाखत देऊन त्यांनी या प्रश्नांची उत्तरं द्यावीत', असं खुलं चॅलेंज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीट करत दिलं आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
'ही मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच'- चंद्रशेखर बावनकुळे
भाजपचे ते 5 प्रश्न कोणते?
Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray Interview : लोकसभा निवडणूक 2024 च्या (Lok Sabha Election 2024) रणधुमाळीत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप हे होतच असतात. अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात कधी काय घडेल हे सांगता येत नाही. रोज नवनवीन मुद्दे चर्चेचा विषय ठरतात. आज चर्चा होतेय ती उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीची... कारण ही मुलाखत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्वत: घेतली आहे. ज्यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावर आता प्रत्युत्तर देत बावनकुळेंनीही टीकास्त्र सोडलं आहे. (bjp chandrashekhar bawankule on uddhav thackeray interview he gave challange by tweet to give answer on 5 questions)
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरेंनी विविध मुद्यांवरून भाजपवर निशाणा साधला. याच्या प्रत्युत्तरात 'हिंमत असेल तर एक मुलाखत देऊन त्यांनी या प्रश्नांची उत्तरं द्यावीत', असं खुलं चॅलेंज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीट करत दिलं आहे.
हेही वाचा : भाजपने राज ठाकरेंना का सोबत घेतले? मोदींनीच दिले उत्तर
'ही मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच'- चंद्रशेखर बावनकुळे
'एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील अनेक माध्यमांच्या संपादकांना मुलाखती देत असताना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आपलेच कर्मचारी असलेल्या संजय राऊत यांना मॅनेज मुलाखत दिली. ही मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच. उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आमच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत,' असं शब्दात चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंवर घणाघाती टीका ट्वीटच्या माध्यमातून केली.
हे वाचलं का?
भाजपचे ते 5 प्रश्न कोणते?
- दहशतवादी कसाबचं समर्थन करणाऱ्या काँग्रेस आणि विजय वडेट्टीवार यांच्याबद्दल तुमची भूमिका काय ?
- 1993 च्या मुंबई बाँबस्फोटातील गुन्हेगार तुमच्या उमेदवाराच्या प्रचारात का होता ?, हा देशद्रोही प्रचारात बघून तुम्हाला लाज वाटली नाही का ?
- सत्तेवर आल्यास हिंदुची संपत्ती मुस्लिमांना वाटण्याचा काँग्रेसचा मनसुबा आहे त्यावर तुम्ही मूग गिळून गप्प का बसलात ?
- राहुल गांधी आणि काँग्रेसचे चेलेचपाटे सातत्यानं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात त्याबद्दल तुम्ही गप्प का आहात ?
- उदयनिधी स्टॅलिन हा हिंदू धर्म संपवण्याची धमकी देतो आणि तुम्ही त्याच्या मांडीला मांडी लावून का बसला होता ?
हेही वाचा : '4 जूनला याच हातांनी मुंडेसाहेबांचे अत्यसंस्कार केले, आता...',
"उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान आहे की, हिंमत असेल तर एक मुलाखत देऊन त्यांनी या प्रश्नांचीही उत्तरं द्यावीत, महाराष्ट्रातील जनता या उत्तरांची वाट पाहत आहे." असं खुलं चॅलेंज चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे. उद्धव ठाकरे आता यावर काय प्रतिक्रिया देतील याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT