कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी महायुतीच्या विजयाचा मार्ग मोकळा? 'एवढे' उमेदवार बिनविरोध विजयी
Kalyan Dombivali Election : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीपूर्वीच महायुतीचे 20 नगरसेवक निवडून आल्याचं चित्र समोर आले आहे. तसेच ज्यांनी माघार घेतली त्यांची यादी आता समोर आलेली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
निवडणुकीपूर्वी महायुतीचे 20 नगरसेवक निवडून आले
महायुतीचे बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची यादी जशीच्या तशी
Kalyan Dombivali Election : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत आज 2 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. अशातच राजकीय उलटफेर चित्र बघायला मिळालं होतं. ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने कल्याण- डोंबिवली महापालिकेवर महायुतीचीच सत्ता येण्याची चिन्हे आता हळू हळू स्पष्ट होऊ लागली आहेत.
हे ही वाचा : 'पनवेलमध्ये पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकली', शेकाप माजी आमदार बाळाराम पाटील संतापले
निवडणुकीपूर्वी महायुतीचे 20 नगरसेवक निवडून आले
दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे एकूण 6 तर दुसरीकडे भाजपचे 14 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. अशातच महायुतीचे एकूण 20 नगरसेवक आधीच निवडून आले आहेत. तसेच याचमुळे महायुतीचाच महापौर बसणार, असा दावा देखील सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे.
तसेच विविध विरोधी पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने सत्ताधाऱ्यांनी महायुतीला थेट फायदा झाला होता. दरम्यान, आतापर्यंत मनसे 5, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 6, काँग्रेस 3 उमेदवार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया 1, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. यामुळे अनेक प्रभागांमध्ये भाजप आणि शिवसेनाचे 20 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. अशातच आता बिनविरोध निवडून आलेल्यांची यादी आता समोर आली आहे.
भारतीय जनता पार्टीचे बिनविरोध निवडून आलेले उमेदवारांचे नाव आणि त्यांच्यासमोर उभे असलेले विरोधी पक्षाचे उमेदवारांचे नाव ज्यांनी निवडणुकीतून माघार घेतला....










