Lok Sabha : '4 जूनला याच हातांनी मुंडेसाहेबांचे अत्यसंस्कार केले, आता...', पंकजा मुंडेंची भावनिक साद

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

 beed loksabha election 2024 pankaja munde emotinal speech of beed gopinath munde
. मुंडेसाहेबांनी मंत्री होऊन देशाच्या विकासाचे स्वप्न पाहिलं होतं.
social share
google news

Pankaja Munde, Beed Lok Sabha : बीड लोकसभा मतदार संघातील भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी बीडकरांना भावनिक साद घातली आहे. 4 जून ही आपल्या निकालाची तारीख आहे,4 जूनला याच हातांनी मी मुंडेसाहेबांचे अंत्यसंस्कार केले आहेत. त्यामुळे वडिलांच्या अंत्यसंस्काराची तारीख व निकालाची तारीख एकच असल्याचे सांगत पंकजा मुंडेंनी (Pankaja Munde) भावनिक साद घातली.  (beed loksabha election 2024 pankaja munde emotinal speech of beed gopinath munde) 

पंकजा मुंडेंसाठी आज उदयनराजे भोसले,धनंजय मुंडे यांनी सांगता सभा घेतली.या सभेत पंकजा मुंडे बोलत होत्या. मुंडेसाहेबांनी मंत्री होऊन देशाच्या विकासाचे स्वप्न पाहिलं होतं. ते स्वप्न मी राज्यात मंत्री होऊन पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आता, मला पुढचा टप्पा पूर्ण करायचा आहे. त्यामुळे, मला निवडून द्या. मी हात जोडते, जातीपातीच्या राजकारणाला बळी पडू नका, असे आवाहन पंकजा मुंडेंनी मतदारांना केले.

हे ही वाचा : Lok Sabha : ''ठाकरेंनी मोदी, फडवणीसांचा विश्वासघात केला'

तसेच 4 जुनला आपला निकाल आहे. मी याच हातांनी 4 जूनला मुंडे साहेबांचा अंत्यविधी केलेला आहे. आपण खरंतर त्या वेळेला मुंडे साहेबांचा सत्कार करणार होतो. अख्खी परळी त्यासाठी सजली होती. तो सत्कार झालाच नाही. त्या सोहळ्याचे स्वप्न अपूर्णच राहिलं तमाम परळीकरांचे प्रेम नियतीने हिरावून घेतलं. आता पुन्हा 4 जून हीच तारीख काळाने आपल्यासमोर आणली आहे. हे अधुरं स्वप्न पूर्ण करण्यासाठीची ही संधी आहे, असं भावनिक आवाहन पंकजा मुंडे यांनी यावेळी मतदारांना केले. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : अमित शाहांचा केजरीवालांवर पटलवार, 'देशाचं प्रतिनिधित्व हे...'

    follow whatsapp

    ADVERTISEMENT