Lok Sabha : अमित शाहांचा केजरीवालांवर पटलवार, 'देशाचं प्रतिनिधित्व हे...'

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

lok sabha election  2024 amit shah reply arvind kejriwal on pm statement narendra modi will be prime minister again
मोदीजी तिसऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान होणार आहेत.
social share
google news

Amit Shah Reply Arvind Kejriwal : 'मोदीजी पुढच्या वर्षी 17 सप्टेंबरला निवृत्त होणार आहेत. त्यामुळे मोदीजी अमित शाह यांना पंतप्रधान करतील', असं मोठं विधान अरविंद केजरीवाल यांनी केले होते. केजरीवाल यांच्या या विधानावर आता अमित शाह यांनी पलटवार केला आहे. इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांना माहिती आहे की, भाजप 400 जागा पार करणार आहे आणि मोदीजी तिसऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान होणार आहेत, त्यामुळेच ते असा गैरसमज पसरवत असल्याचा पलटवार अमित शाह (Amit Shah)यांनी केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर केला आहे. (lok sabha election  2024 amit shah reply arvind kejriwal on pm statement narendra modi will be prime minister again)  

अमित शाह यांनी एएनआयला प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये अमित शाह यांनी अरविंद केजरीवाल यांच्या विधानावर भाष्य केले. 'या देशातील पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण किंवा ईशान्येतील लोकही मोदींसोबत उभी आहेत. भाजपच्या घटनेत अशी कोणतीही तरतूद नाही आणि मोदीजी 2029 पर्यंत देशाचे नेतृत्व करतील. मोदीजी येत्या निवडणुकीतही नेतृत्व करतील, असे अमित शाह यांनी सांगितले आहे.  

हे ही वाचा : Imtiyaz Jaleel : 'नवनीत राणा चीप मेंटलिटीची बाई, प्रसिद्धीसाठी नाचायला...'

अमित शाह पुढे म्हणाले,  इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांना माहित आहे की आपण 400 जागा पार करणार आहोत आणि मोदीजी तिसऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान होणार आहेत, त्यामुळेच ते असा गैरसमज पसरवत आहेत, अशी टीका त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर केली. तसेच  इंडिया आघाडीसाठी कोणतीही चांगली बातमी नाही. त्यांना खूश होण्याची गरज नाही आहे. त्यांना जास्त परिश्रम करण्याची गरज आहे. भ्रष्टाचार बंद केला पाहिजे, लोकांसोबत सहानुभूती आणि संवेदनशीलतेने काम केले पाहिजे. त्यामुळे असे खोटे बोलून ते निवडणूक जिंकू शकत नाहीत, असा हल्ला देखील अमित शाह यांनी इंडिया आघाडीवर चढवला. तसेच कोणत्याही प्रकारचा भ्रम भाजप पक्षात नाही आहे. हे जनतेसमोर स्पष्ट होणे गरजेचे आहे, असे देखील अमित शाह यांनी सांगितले. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अरविंद केजरीवाल काय म्हणाले?  

मी भाजपला विचारतो तुमचा पंतप्रधान कोण असेल? तुम्ही विचार कराल केजरीवाल हे काय बोलतोय.. मोदीजीच असतील ना.. नाही.. मोदीजी हे पुढच्या वर्षी 17 सप्टेंबरला 75 वर्षांचे होणार आहेत. 2014 साली मोदींनी स्वत: नियम बनवला होता की, भाजपमध्ये जे 75 वर्षांचे असतील त्यांना रिटायर केलं जाईल. सगळ्यात आधी अडवाणींना रिटायर केलं. त्यानंतर मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन यांना निवृत्त केलं गेलं.. आता पुढच्या वर्षी मोदीजी रिटायर होणार आहेत. तर मी भाजपला विचारू इच्छितो की, तुमचा पंतप्रधान पदाचा दावेदार कोण आहे? असा सवाल केजरीवाल यांनी केला होता. 

हे ही वाचा : 'तर मी राजीनामा देऊन पंकजाला...', उदयनराजे का रडले?

केजरीवाल पुढे म्हणाले, जर यांचं सरकार आलं तर...पहिल्या दोन महिन्यात योगींना हटवतील...नंतर मोदींचे सगळ्यात खास अमित शाह यांना पंतप्रधान बनवलं जाईल. मी लोकांना सांगतोय की, मोदीजी हे स्वत:साठी मत नाही मागतए.. मोदीजी हे अमित शाह यांना पंतप्रधान बनविण्यासाठी मत मागत आहेत. त्यामुळे काय अमित शाह हे मोदींची गॅरंटी पूर्ण करतील? पण मला वाटत नाही की, यांचं सरकार बनेल म्हणून असे केजरीवाल म्हणालेत. 
 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT