'या' कारणावरुन चिडला अन् थेट मित्राचे शिर धडावेगळे केले, तलवारीच्या टोकावर ठेवले अन् गावभर नाचला; हादरवून टाकणारं प्रकरण

मुंबई तक

Crime News : माणूस किती क्रूर होऊ शकतो याचा प्रत्यय आणून देणारी एक घटना समोर आली आहे. एका नराधमाने आपल्या मित्राचा खून करुन त्याचे शिर धडावेगळे केले. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर ते शिर तलवारीच्या टोकावर ठेवून सबंध गावभर फिरला. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. हा प्रकार नेमका कुठं घडला आणि  कुणी ही क्रूर हत्या केली जाणून घेऊया. 

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

मित्राचे शिर धडावेगळे केले, तलवारीच्या टोकावर ठेवले अन् गावभर नाचला

point

हादरवून टाकणारं प्रकरण

Crime News : माणूस किती क्रूर होऊ शकतो याचा प्रत्यय आणून देणारी एक घटना समोर आली आहे. एका नराधमाने आपल्या मित्राचा खून करुन त्याचे शिर धडावेगळे केले. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर ते शिर तलवारीच्या टोकावर ठेवून सबंध गावभर फिरला. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. हा प्रकार नेमका कुठं घडला आणि  कुणी ही क्रूर हत्या केली जाणून घेऊया. 

हे ही वाचा : घरच्यांचा विरोध असताना लव्ह मॅरेज, मुलगी झाल्यानंतर दोन वर्षांनी सासरी गेला, पण सासऱ्याने अन् मेहुणीने जागेवर संपवलं

बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातील ही घटना आहे. सुधांशु कुमार ऊर्फ शर्माजी असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी विकेश पासवान ऊर्फ मलिंगा याच्यासह पाच जणांना अटक केली आहे. तसेच हत्येसाठी वापरलेली तलवार, मृताचे शिर आणि त्याची सायकलदेखील जप्त केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मलिंगासह राजेश रंजन, अर्जुन पासवान, दीपक आणि नितीश कुमार यांचा समावेश आहे.

दारु व्यवसायावरुन वाद

पोलिसांनी सांगितले की, मुख्य आरोपी मलिंगा आणि मृत सुधांशु हे पूर्वी मित्र होते, मात्र त्यांच्यात अवैध दारू व्यवसायावरून गेल्या काही दिवसांपासून वैमनस्य निर्माण झाले होते. दोघांच्याही नावावर गुन्हेगारी नोंदी असून मलिंगा हा फरार आरोपी होता. सुधांशु आपली हत्या करेल, अशी भीती मलिंगाला वाटत होती. याच भीतीपोटी मलिंगाने 10 मार्चला रस्त्यात सुधांशुला एकटे गाठले आणि आपल्या साथीदारांच्या मदतीने त्याचे पाय तोडून भररस्त्यात तलवारीने त्याचा गळा चिरला.