अशोक खरातच्या लैंगिक संबंधाच्या 58 Video Clips, 'ही' Inside Story तुम्हालाही टाकेल हादरवून

मुंबई तक

नाशिकमधील बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या ज्योतिषी अशोक खरात उर्फ कॅप्टन खरातच्या अडचणी वाढत आहेत. पोलिसांनी 58 व्हिडिओ क्लिप्स जप्त केल्या असून खरातची 150 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीची मालमत्ताही असल्याचे समोर आले आहे.

ADVERTISEMENT

58 video clips of ashok kharat sexual encounters know shocking inside story of this case
आरोपी अशोक खरात (फाइल फोटो)
social share
google news

नाशिक: नाशिकमधील भोंदूबाबा आणि महिलांचे लैंगिक शोषण करणारा अशोक खरात हा राजकारणी, व्यावसायिक आणि सेलिब्रिटींचे भविष्य सांगायचा. ज्या जोरावर त्याने कोट्यवधी रुपयांची कमाईही केली होती. पण आता हाच अशोक खरात गंभीर गुन्हेगारी आरोपांमध्ये अडकला आहे. स्वतःला 'कॅप्टन' म्हणवणाऱ्या अशोक खरातच्या अटकेनंतर, जसजसे पुराव्यांचे पदर उलगडत आहेत, तसतसे धक्कादायक चित्र समोर येत आहे. बलात्कार आणि ब्लॅकमेलिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या खरातकडे 58 व्हिडिओ क्लिप्स आणि 150 कोटींहून अधिक किंमतीची मालमत्ता आढळली आहे.

नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट-1 ने 18 तारखेला पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास अशोक खरातला अटक केली. त्याच्या विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात एका 35 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला होता. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, महाराष्ट्र सरकारने तपास विशेष तपास पथकाकडे (SIT) सोपवला आहे. या पथकाचे नेतृत्व महिला आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते करत आहेत. सूत्रांनुसार, त्यांनी आरोपीची सुमारे दोन तास चौकशी केली, परंतु याबाबत अधिक तपशील अद्याप अधिकृतपणे देण्यात आलेला नाही. तपास अजून प्राथमिक टप्प्यात असून, तथ्ये समोर आल्यावर पुढील कारवाई केली जाईल, असे त्यांचे म्हणणे आहे.

58 व्हिडिओ आणि अनेक प्रश्न

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक पुरावा म्हणजे 58 व्हिडिओ क्लिप्स असल्याचे म्हटले जात आहे. हे व्हिडिओ छाप्यादरम्यान विविध डिजिटल उपकरणांमधून जप्त करण्यात आले. यापैकी काही व्हिडिओमध्ये महिला आणि प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश असल्याचाही दावा करण्यात येत आहे. तथापि, पोलिसांनी अद्याप याची पुष्टी केलेली नाही. या व्हिडिओंची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. जर हे आरोप खरे ठरले, तर हे प्रकरण केवळ लैंगिक शोषणापुरते मर्यादित न राहता एका मोठ्या ब्लॅकमेलिंग रॅकेटचे स्वरूप घेऊ शकते, असे वृत्त आहे.

ब्लॅकमेलिंगमधील एक नवीन पैलू

दरम्यान, आणखी एक प्रकरण समोर आले आहे. शिर्डीतील एका महिलेने तक्रार दाखल केली आहे की, तिला एका फोन नंबरवरून एक आक्षेपार्ह फोटो पाठवण्यात आला आणि तो व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी करण्यात आली. या प्रकरणात आरोपीच्या कार्यालयाशी संबंधित कर्मचारी नीरज जाधव याचे नाव समोर आले आहे. महिलेचा दावा आहे की, काही वर्षांपूर्वी ती खरातच्या कार्यालयात गेली होती आणि तिथे तिचे फोटो काढण्यात आले होते. आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की, नीरज जाधव हे कृत्य एकट्याने करत होता की यामागे एखादे मोठे नेटवर्क होते. त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही, परंतु पोलीस या बाजूने गांभीर्याने तपास करत आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp